Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

दिल्ली येथे महाराष्ट्रातील मच्छीमार बांधवांसाठी केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांसी मच्छीमारांच्या विविध मुद्यांवर चर्चा...!



आज दिल्ली येथे महाराष्ट्रातील मच्छीमार बांधवांनी व महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ मर्यादित मुंबई च्या संचालक मंडळाने अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष श्री.तुकाराम वानखेडे यांच्या मार्गर्शनाखाली केंद्रीय कॅबिनेट पशुसंवर्धन,दुग्ध व मत्स्यव्यवसाय मंत्री मा.श्री.ना.पर्शोत्तम रूपाला साहेब व केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री मा.श्री.रावसाहेब दानवे साहेब व केंद्रीय वित्त राज्य मंत्री मा.श्री.भागवत कराड साहेब यांची भेट घेतली व मच्छीमारांच्या विविध मुद्यांवर चर्चा केली यामध्ये पुरेसा पाऊस न झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करून मच्छिमारांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी, 3 जुलै 2019 चा शासन निर्णय कायम ठेवावा, पाकिस्तान मध्ये कैद असलेल्या मच्छीमारांची त्वरित मुक्तता करण्यात यावी, या कैद्यांची सुटका होई पर्यंत मच्छीमारांच्या कुटुंबांना प्रतिदिन तीनशे रुपये प्रमाणे आर्थिक मदत मिळावी,समुद्रामध्ये मच्छिमार करणाऱ्या स्थानिक आगरी, कोळी मच्छिमारांना सवलतीच्या दरात डिझेल, पेट्रोल मिळावे तसेच महाराष्ट्रातील मच्छीमारांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दिवाळी पूर्वी तारीख देऊन उपस्थित राहण्याचे आश्वासन मा.मंत्री श्री रुपाला व मा.मंत्री श्री.दानवे साहेब व मा.मंत्री श्री.कराड साहेब यांनी दिले यावेळी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघाचे चेअरमन श्री.विजय गिदी, उपाध्यक्ष श्री.नाना कदम, संचालक श्री.तुकाराम वानखेडे, तज्ञ संचालक श्री.प्रकाश लोणारे, संचालिका श्रीमती ज्योती मेहेर, संचालक श्री.राजेंद्र मेहेर, संचालक श्री.रवी पाटील,संचालक श्री बाबमिया मुकादम, श्री.पांडुरंग गल्लापवाड, श्री.राजू प्रधान ,श्री.उमेश मुदिराज, श्री.गजानन टोकलवाड, श्री.यशवंत खरात, श्री.व्यंकट नागलवाड, श्री.संदीप वानखेडे उपस्थित होते त्याच प्रमाणे राष्ट्रीय मत्स्य जीवी सहकारी संघ नवी दिल्ली येथे वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री.तुकाराम वानखेडे साहेब (शासकीय समिती सदस्य,महाराष्ट्र राज्य) यांचा सत्कार करण्यात आला तसेच वरील सर्व उपस्थित मान्यवर बांधवांनी श्री.तुकाराम वानखेडे यांचे दिल्ली येथे मंत्री साहेबांची भेट घालून  दिली त्या बद्दल आभार मानले..



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध