Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
तापी नदीकाठच्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी...! मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांची आग्रही मागणी...!
तापी नदीकाठच्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी...! मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांची आग्रही मागणी...!
चोपडा(प्रतिनिधी):-तालुक्यातील तापी नदी काठावरील शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास महापुराच्या पाण्याने हिरावून घेतला असुन या शेतकऱ्यांचे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकांन्वये केलेली आहे.
हतनूर धरणाच्या वरील भागात अतिवृष्टी झाल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले होते. सतत दोन दिवस तापी नदीला महापूर सुरू होता. त्यामुळे तापी नदी काठावरील शेकडों हेक्टर शेतीत पाणी घुसल्याने सर्वच पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे.
काही गावांना पुराचा वेढा पडल्याने तेथील संपर्कही काहि काळ बंद होता. संबंधित विभागाचे अधिकारी यांनी याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. तरिही आपापल्या गावातील तापी नदी काठावरील नुकसानग्रस्तं शेतकऱ्यांनी स्वतः हजर राहून शंभर टक्के नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत, असेही आवाहन गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा