Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

स्वर्गवासी पवन मोरे साहेबांचा अपघाती मृत्यू व नियतीचा क्रुर खेळ. हसतमुख,दिलखुलास,राजबिंडा,जनटलमॅन माणूस अखेर काळाचा पडद्याआड.



काल पहाटे रविवारी अचानकपणे पवन मोरे साहेबांच्या मृत्यूची बातमी धडकली.मात्र विश्वास बसू नये अशी ती बातमी होती.माझी व त्यांची बातचीत चार दिवसापूर्वी झाली होती आणि ते म्हणाले होते की,धुळ्याच्या कोर्टामध्ये पांझरा कान विषयीची तारीख जवळच आहे व निकाल आपल्या बाजूने लागल्यावर आपण प्रत्यक्ष पने कामाला सुरुवात करु शकतो.या विषयी बोलण झाल आणि आज हा काळा दिवस उजाडला खूप मोठी हनी झाल्याचा प्रत्यय आला मौजे बहुर खामखेडा ता.देवळा जि.नाशिक येथील त्यांचे मूळ गाव होते.परंतु त्यांचे वास्तव्य लहान पणा पासून नाशिक येथेच होते त्यांनी उच्च शिक्षणही नाशिक येथेच केले होते आमचा अहिरराव परिवाराशी त्यांचे गेल्या तीन वर्षापासून खूप जवळचे ऋणानुबंध होते प्रत्येक सुखदुःखात त्यांनी आम्हाला प्रचंड सहकार्य केले आहे तसे असल्यामुळे लहान भावासाखे वागणूक त्यांनी मला आजवर दिली हे मी कधीही विसरू शकत नाही त्या माणसांमध्ये जो उत्साह संचारलेला असायचा त्याची जगात कुठे किंमत होऊ शकत नाही पवन मोरे म्हणजे एक अलगच रसायन होतं एक दिलखुलास मनमिळाऊ डॅशिंग पर्सनॅलिटी एक जेंटलमन माणूस आपल्यातून भगवंताने हिरावून नेला याचे दुःख आयुष्यात कधीही न विसरण्यासारखे आहे आम्हाला
त्यांचा अपघाती मृत्यूची बातमी काल सकाळी आठ वाजता मिळाली तसाच मी व आमचे चार मित्र असे सर्वजण नाशिकला तात्काळ त्यांची अंत्यविधीसाठी निघालो. शनिवारी रात्री मुंबईहून पवन मोरे साहेब त्यांचे कारखान्यासंबंधीचे काही काम आटोपून नासिककडे प्रवासाला निघाले होते.जुना कसारा घाट जव्हार फाटा (ठाणे) जवळ रात्री तीन वाजता ते पोहोचले.त्यांचे मित्र श्री नरेंद्र पाटील फॉर्चूनार कार चालवत होते,पण गाडी रस्त्याच्या कडेला उतरली व एका चारी मध्ये अडकली.अडकलेली गाडी पाहण्यासाठी ते खाली उतरले व वाहतूक पोलिसांना हेल्पलाइन ला फोन करू लागले.ते फोन करत करत गाडीच्या मागच्या बाजूने येऊन वळसा घेत ड्रायव्हर साईडला चालत येत असतांनाच मागून येणाऱ्या ट्रकने प्रचंड धुक्यामळे धडक दिल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला व मालट्रक बेनामी झाला.अशा प्रसिद्ध लोकांच्या मृत्यूच्या घटना तर घडून जातात,पण मागे अनेक शंकाकुशंका ठेवून जातात.प्रत्येक अपघात हा अपघातच असतो की,अजून काही असते अशा शंका डोकावत असतात आणि त्याविषयीच्या चर्चा दबक्या आवाजात समाजात उलट सुलट चर्चा होत असतात.परंतु हा भाग पोलिसांचा व शोधाचा भाग आहे.असो पण असा लाख मोलाचा जीव गेल्यानंतर त्यापुढे सर्व काही निरर्थक आहे .पवन मोरे साहेबांना मुल बाळ झालेले नसल्यामुळे त्या विधवा पत्नीच्या वाटेला अत्यंत एकाकी जीवन जगण्याचे घोर दुःख आले.त्यांनी पांझरा कान सहकारी साखर कारखाना चालू करण्याच्या प्रयत्न केला. हा त्यांचा प्रयत्न बऱ्याच लोकांना संशयास्पद वाटत होता. तरीसुद्धा तालुक्यामध्ये एक थोडासा का होईना पण काही काळ होता की पांजरा कान चालू होण्याची आशा निर्माण झाली होती.त्यांचा प्रयत्न किती खरा किंवा खोटा होता ते देव जाणे,परंतु माणूस म्हणून अत्यंत दिलदार,हसतमुख व राजबिंडा व्यक्तिमत्व होत .रात्रंदिवस पळणारा हा माणूस अफाट कष्ट उपसणारा होता व अत्यंत कमी वयात आई वडील प्राध्यापक असतांनाही त्यांची मदत न घेता उद्योजक म्हणून स्वतःनाव कमावले होते.माणसाचा इतिहास हा त्याच्या कामावरून व त्याच्या तोंडातून निघालेल्या शब्दावरून ठरत असतो.
अशी माणसं जग सोडून जातात तेंव्हा त्यांचेही पारिवारिक नुकसान होते व समाजाचेही प्रचंड नुकसान होते पवन मोरे साहेबांना पुन्हा एकदा अहिरराव परिवार धाडने यांचा कडून मी स्वतः श्री चंद्रशेखर अहिरराव साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या आत्म्यास दीर्घकालीन शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध