Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३
थाळनेर गावाच्या माजी सरपंच महिलेची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या...!
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहरातील सदाशिव नगर येथील महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सहा सप्टेंबरला सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडली.
रेखाबाई विजय वाडिले भोई (वय 40) असे मृत महिलेचे नाव आहे.त्या थाळनेर गावाच्या माजी सरपंच होत्या.मुलांच्या शिक्षणासाठी त्या काही काळापासून शिरपूर शहरात सदाशिव नगरमध्ये राहत होत्या. सकाळी घरात कोणीही नसतांना त्यांनी गळफास लावून घेतला.ही घटना लक्षात येताच त्यांना खाली उतरवून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय तपासणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.या घटनेचे वृत्त कळताच समाज बांधवांसह पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी रुग्णालयात जमली.शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा