Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय सावळदे येथे स्व.तपन भाई पटेल यांच्या स्मरणार्थ श्री.चिंतनभाई पटेल यांच्या शुभहस्ते शालेय विद्यार्थ्यांना टॉवेल व शैक्षणिक साहित्य वाटप...!
आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय सावळदे येथे स्व.तपन भाई पटेल यांच्या स्मरणार्थ श्री.चिंतनभाई पटेल यांच्या शुभहस्ते शालेय विद्यार्थ्यांना टॉवेल व शैक्षणिक साहित्य वाटप...!
शिरपूर प्रतिनिधी:- आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय सावळदे येथे स्व.तपन भाई पटेल यांच्या स्मरणार्थ श्री. चिंतनभाई पटेल युवा प्रतिष्ठान शिरपूर जिल्हा धुळे च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना टॉवेल व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध उद्योगपती एस.
व्ही.के.एम.संस्थेचे ट्रस्टी,युवा नेते मा.चिंतनभाई पटेल यांनी भूषविले. सुरुवातीला स्व.तपनभाई पटेल व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना टॉवेल,वह्या,पेन, कंपास बॉक्स, पेन्सिल हे संच वाटप करण्यात आलेत.
यावेळी कार्यक्रमातील पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.एन.पी.देवरे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी गावाचे सरपंच श्री.अनिल दोरीक उपसरपंच श्री.सचिन राजपूत मार्केट कमिटी संचालक श्री. विठोबा महाजन ,सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रेमचंद शिरसाट पंचायत समिती सदस्य श्री.यतिश सोनवणे, पोलीस पाटील श्री. जयपालसिंग गिरासे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री.आकाश मराठे,
तर कार्यक्रमासाठी भाजपा युवा माेर्चाचे पदाधिकारी रितेश राजपूत, भुरा पाटील, अजिक्य शिरसाठ, राहुल जाधव, राेशन साेनवणे, रणजित राजपूत, मायकल ठाकरे, सुनिल मगरे, संदिप कुंवर तर सावळदे येथील प्रकाश भाेई, भास्कर महाजन, बाळू काेळी, ग्रामपंचायत सदस्य धुडकू जगदेव, राजु साेनवणे, प्रवीण जगदेव, अपर्णा जाधव, नंदाबाई जाधव उपस्थित हाेते. मा.चिंतनभाई पटेल युवा प्रतिष्ठान चे पदाधिकारी,गावातील विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य,पालक सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकांनी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.एन.पी.देवरे यांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.विद्यालयातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री.एस. आर.जावरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने सर्व शिक्षक स्टाफचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एम.एल.जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सौ.एस. बी.चव्हाण केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा