Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३
आपण सर्वांना माहीत आहे की बाप्पा आले आहेत.आपल्या शहरात सर्व कडे अगदी उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण झाले आहे. परंतू दरवर्षी प्रमाणे आज बाप्पांचे विसर्जन आहे.या वेळी मोठ्या प्रमाणात गणेश भक्त नदीच्या पात्रा मध्ये निर्माल्य म्हणजे बाप्पाला चढवलेले पान फुल फळ
आणि प्लास्टिक चे विसर्जन शिरपूर जवळील अरुणावती नदी पात्रात करतात,तरी नदी काठावर निर्माल्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते,
याच प्रादुर्भावामुळे काही जिवांची हानी होते, आणि नदी काठ दूषित होते.
या परिणामांना रोखणया साठी
आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर (इंजिनिअरिंग कॉलेज) येथील आमचा 'क्लब समर्पण' हा छोटा प्रयत्न करीत आहोत.
क्लब समर्पण काय आहे ? सोशल अक्टिविटी करणारा क्लब आहे. दरवर्षी समर्पण चे वेगवेगळे उपक्रम शिरपूर मध्ये व शिरपूर बाहेर होत असतात. मागील वर्षी आम्ही थाळनेर येथे मुक बधीर मुलांना धान्य आणि काही गरजेच्या वस्तू दिल्या होत्या. या नंतर उनहल्याच्या उष्ण तापमान या पासून पक्षणा बचाव मानून आम्ही 'विहंगम' नावाचा एक उपक्रम राबवला होता. या मध्ये आम्ही कलेगच्या कॅम्पस मध्ये आम्ही तयार केलेले bird fider लावले होते. व इत्यादी उपक्रम आम्ही क्लब मेंबर्स वर्षभरात करत असतो. वृक्षरोपण sanitary pad चे खेड्या पाड्यातील महिलांना वाटप व इत्यादी उपक्रम. या मध्ये प्रमुख सहभाग आम्हा क्लब मेंबरचा तर असतोच पण त्या सोबत आम्हाला मार्ग दर्शन करणाऱ्या आमच्या कॉलेज चा Dean डॉ.अमृता भंडारी मॅडम याचा असतो.त्याच प्रमाणे आजचा उपक्रम 'परिवर्तनम् ' ही संकल्पना आम्हा क्लब मेंबर्स आणि मॅडम यांची आहे.
येणाऱ्या दिनांक २३ सप्टेंबर शनिवार व २५ सप्टेंबर सोमवार रोजी
बाप्पाचे विसर्जन होते, या वेळी आम्ही क्लब मेंबर्स विसर्जनाच्या
ठिकाणी उपस्थित होतो, सर्व गणेश भक्त यांच्या कडून आम्ही निर्माल्य सारख्या वस्तू आमच्या कडे जमा करत होतो.
सहसा लोक बाप्पाचे विसर्जन करतात आणि त्या सोबत पाच किंवा सात दिवसाचे निर्माल्य म्हणजे फुलमला, फळ, पान, व सर्वात महत्त्वाचे प्लास्टिक सारख्या वस्तू पाण्यात विसर्जित करतात तर या गोष्टी ना रोखण्या साठी आम्ही क्लब मेंबर्स या ठिकाणी उपस्थित होतो.
आम्ही विसर्जनाला आलेल्या गणेश भक्तांकडून निर्माल्य गोळा केले.
या निर्माल्याचे आम्ही काय करणार ?
सदर निर्माल्य हे Biodegradable असते त्या मुळे ते बुजल्या नंतर
त्याचे खत बनवता येते.या मुळे काहीना काही प्रमाणात झाडांसाठी व
शेती साठी पूरक असे खत तयार होईल ही आमची अपेक्षा आहे.
या कार्यासाठी क्लब मेंबर्स त्या सदर ठिकाणी उपस्थित होते, आमच्या क्लब चे Head:- कुंदन सुरेश शिंदे, Co-head:- दिशा द्यानेश भेरडे, विशाल प्रकाश वंजारी, Publicity Head:- कुणाल किशोर सोनार, Co-ordinators म्हणून:- अंजली धनराज पवार, निखिल सुनिल पाटील, नितेश वसंत पाटील, राहुल अशोक शर्मा, सिद्धी अविनाश कुलकर्णी, पाटील मंथन सुभाषराव, इशिता राजेंद्र पाटील. Volunteers म्हणुन:- अनिकेत सोमिनाथ पाटील-थाले, रविराज विजय कोळी, मयुर रमेश चव्हाण, हर्षल सतिश चव्हाण, गौरव भिकन गवळी, प्रांजल ज्ञानेश्वर शिरसाठ, दिनेश वसंत सोनवणे, चौरक्षा विश्वास भावसार, पाटील तुषार संजय, पाटील कल्पेश पारशांत, भिरूड सौरभ महेंद्र, पाटील चैताली लक्ष्मण, पाटील हंसिका विजय, पाटील धनश्री हिरालाल, पाटील दिपाली रवींद्र, पाटील ममता साहेबराव, मयूर विजय पाटील तिसरा, हृषीकेश श्यामकांत देशमुख, हितेश सुनील चौधरी,कुंदन संजय बडगुजर, कार्तिक रमाकांत कोळी, यश भारत कोळी हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते.
त्या सोबत शिरपूर नगरपालिकेचे स्वच्छता करणारे कर्मचाऱ्यांनी आमची मोठी मदत केली.व शिरपूर वरवडे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आमची कौतुक केले.
या उपक्रमात दरम्यान आम्ही एक घोषणा केली,बाप्पा ला प्रदूषणमुक्त निरोप देऊया..... निर्माल्य दान करूया.....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा