Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या त्रुटींच्या पुर्ततेसाठी 29 सप्टेंबर रोजी विशेष शिबीराचे आयोजन....!





धुळे : दिनांक 26 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्त); जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडे जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी अभावी प्रलंबित आहेत अशा सर्व अर्जदारांच्या त्रुटींची पुर्तता करण्यासाठी शुक्रवार दि.29 सप्टेंबर,2023 रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य राकेश महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे मार्फत नोकरी विषयक जात वैधता प्रस्ताव तसेच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रस्ताव पडताळणीसाठी सादर केले होते.अशा सर्व जाती दावा प्रकरणामध्ये समितीस्तरावर प्राथमिक छाननी करुन ज्या प्रकरणामध्ये कागदपत्रे, पुरावे अभावी त्रुटी आढळून आलेली आहे. अशा प्रकरणामध्ये त्यांनी दिलेल्या जातीच्या दावा प्रस्तावामध्ये नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे,इमेल, लेखी पत्रान्वये त्रुटी कळविण्यात आलेली आहे.

ज्या अर्जदारांनी त्रृटी पुर्तता केली नसेल अशा नोकरीतील (सेवाविषयक ) आणि राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनी शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर, 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी-विंग, सिंचन भवनच्या मागे, साक्री रोड, धुळे येथे उपस्थित राहून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉ. अर्जुन चिखले तसेच उपायुक्त राकेश महाजन यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध