Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
सहकार की स्वाहाकार ? दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँकेतील गैरप्रकारांची मालिकाच उजेडात ? सर्वसामान्यांच्या 100 कोटींच्या ठेवींच्या जीवावर नियमबाह्य कर्ज वाटपाची जणू खैरातच !
सहकार की स्वाहाकार ? दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँकेतील गैरप्रकारांची मालिकाच उजेडात ? सर्वसामान्यांच्या 100 कोटींच्या ठेवींच्या जीवावर नियमबाह्य कर्ज वाटपाची जणू खैरातच !
शिरपुर (प्रतिनिधी):- दि.शिरपुर मर्चंटस को-ऑप बँकेविरुद्ध जागृत सभासदांच्या अनेक तक्रारी आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेअरमन प्रसन्न जैन च्या मोठ्या भावाला लाखोंच्या अवैध आणि नियमबाह्य पद्धतीने कर्ज वितरण त्याने स्वतः कबूल केल्यानंतर त्याच्या लहान भावाच्या नावावरही लाखोंचे नियमबाह्य कर्ज देण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. तसेच, अनेक वर्षे जुन्या अनियमित आणि बेकायदेशीर कर्ज वितरणाच्या प्रकरणात, कोणत्याही मौल्यवान कागदपत्रांशिवाय किंवा हमीदाराशिवाय आणि कोणत्याही स्थावर मालमत्तेचे तारण न ठेवता 50 लाख रुपयांचे असुरक्षित कर्ज राकेश रमेश धाकड या कर्जदाराला वितरित केले गेले आहे. या बँकेच्या अंतरिम लेखापरीक्षकांनी लेखी स्वरूपात या प्रकरणी आडिट रिपोर्ट मध्ये अनेक वर्षांपासून दोष नोंदविलेला आहे.
अनेक वर्षांपासून हे कर्ज प्रकरण विनासायास डोळेझाक करून सुरळीत दाखविले जात होते.याला जबाबदार कोण? शेवटी या अत्यंत गंभीर घटनेची तक्रार शिरपुर मर्चंटस् बँकेचे जागरूक सदस्य हर्षल ए.अग्रवाल यांनी नाशिकच्या पोलीस महानिरीक्षक (आयजी) यांच्याकडे केलेली होती. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आयजी साहेबांनी दिलेले तपासाचे आदेश आता धुळे एसपी कार्यालयामार्फत स्थानिक शिरपुर पोलीस ठाण्याला आले आहेत.तक्रारदाराचा जाब जबाब घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती आहे.म्हणजेच तपासाचे चटके आता गैरप्रकार करणा-यांना उघड करण्यासाठी शिरपूर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत.या संदर्भात तक्रारदार हर्षल अग्रवाल यांच्यावरही विविध प्रकारचा दबाव टाकला जात असल्याची माहिती मिळाली आहे.
म्हणजे तक्रारदार सभासदांनी यापुढे तक्रार करून या बँकेचे आणखी अप्रकाशित भयानक घोटाळे बाहेर काढू नयेत. परंतु, तपास सत्य आणि प्रामाणिकपणे झाला तर अनेक अशी गंभीर प्रकरणे उजेडात येतील. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या वैयक्तिक हितसंबंधांना सुध्दा बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र आता हा भ्रष्टाचार दाबणे कठीण होत आहे.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कडे चेयरमन प्रसन्न जैन ला अपात्र घोषित करण्याची मागणी जागरूक सभासदांनी जाहीररित्या व लेखी स्वरूपात केलेली आहे.
तसेच चेयरमन प्रसन्न जैन ने अवैध व नियमबाह्य पद्धतीने सख्ख्या बंधूच्या नावांवर लाखोंचे कर्ज दिल्याचे वार्षिक सर्वसाधारण सभेत कबूली दिली आहे.तरीही आजपावेतो त्याने ह्या कर्जाची रक्कम भरलेली नाही.असे असतांना सुध्दा ताबडतोब त्यांस अपात्र घोषित करून याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कार्रवाई न करता जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांना संधी का देत आहेत ? या बँकेच्या सर्वसामान्य सभासदांना न्याय द्यावा आणि सहकारी संस्थांच्या बाबतीत प्रशासनावर असलेला विश्वास कायम राखावा ही मागणी आता या बँकेच्या सभासदांतर्फे तीव्र स्वरूपात जोर धरू लागली आहे.
फक्त न्याय करित आहोत असे न दाखविता प्रत्यक्ष कार्रवाई करुन न्याय देत असल्याचे दिसले पाहिजे ही सभासदांची आग्रही भूमिका आहे.आता कोणीही कितीही या बँकेच्या गैरप्रकारांना झाकण्याचा प्रयत्न केला तरीही जागृत सभासदांतर्फे वरिष्ठ स्तरावर तक्रारी दाखल झालेल्या आहेत.आता अशी अनेक वर्षांपासून दडविलेली प्रकरणे आणि त्यातील लाभार्थ्यांची नांवे पुराव्यानिशी लवकरच बाहेर निघतील अशी तालुकाभर चर्चा सुरू आहे. सर्वसामान्यांचे हे बँक वाचवण्यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी ठेवीदारांमधून सभासदांकडून व जनतेतून होत आहे.
(सविस्तर वाचा पुढील अंकात...!)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा