Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
बँकेचे 14 संचालकांना अपात्र ठरविण्याकरिता बोलाविलेल्या सुनावणी वेळी बँक बचाव समितीच्या पदाधिका-यांनाही सामिल करावे!- दि शिरपुर मर्चंटस को-ऑप बँक बचाव समितीची मागणी!
बँकेचे 14 संचालकांना अपात्र ठरविण्याकरिता बोलाविलेल्या सुनावणी वेळी बँक बचाव समितीच्या पदाधिका-यांनाही सामिल करावे!- दि शिरपुर मर्चंटस को-ऑप बँक बचाव समितीची मागणी!
शिरपुर (प्रतिनिधी):- आमच्या तक्रारीवरून दि शिरपुर मर्चंटस को-ऑप बँकेचे चेअरमन प्रसन्न जयराज जैन यांना जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी अपात्र ठरविले आहे.अत्यंत योग्य कार्रवाई केल्याबद्दल आमच्या समितीतर्फे जिल्हा उपनिबंधकांचे आभार मानतो.दि शिरपूर मर्चंटस् को-ऑप बँकेचे एकूण कारभाराचे अवलोकन केलेले असता बँकेत या 5- 10वर्षांत अत्यंत अनागोंदीपणे कारभार सुरू आहे.
त्यात नियमबाहय, विनातारणी कोटयावधी रूपयांचे बेकायदेशीरपणे अंधाधुंद कर्जवाटप केल्यामुळे बँकेत ७७% एनपीए वाढून बँक मागील ३ वर्षांपासून सतत 'क' वर्गात आहे.
सभासदांना १% ही डिव्हिडंड दिलेला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहकारी नियम कायदा व रिझर्व बँकेचे बँकिंग रेग्युलेशन सर्वस्वी उल्लंघन करून या संचालक मंडळाने व विद्यमान मॅनेजरने संगतमताने कोणत्याही आवश्यक बाबींची पूर्तता न करता मागील ५ वर्षाचा दोषदुरूस्ती अहवाल सुध्दा जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केलेला नाही. तसे जिल्हा उपनिबंधकांचे कार्यालयीन पत्र जावक क्रं. बि. ७ / शिरपूर मर्चंटस् बँक / ले.प.अ. वाचन / सन २०२३ / २९७५ दि. १९ ऑक्टोबर २०२३ अंतर्गत आम्हाला प्राप्त झाले आहे.यावरून असे सिध्द होते की सदर या बँकेचे सर्व १४ संचालकांनी कोणत्याही प्रकारे या बँकेचे व सभासदांचे हित न पाहता कार्य केले.त्यांना या बँकेबद्दल व सभासदांविषयी आस्था व आपुलकी दिसून येत नाही.आपल्या कर्तव्यात त्या सर्वांनी पूर्णतः कसून करून जबाबदारी झटकलेली स्पष्ट दिसून येते. तरी या सर्व या १४ संचालकांचे संचालक पद रद्द तर व्हावेतच, परंतु त्यांना सहकारी नियम कायदा व उपविधी प्रमाणे पुढील ६ वर्षासाठी अपात्र घोषित करून त्यांचे कार्यकाळातील संपूर्ण जबाबदारी निश्चित करावी.आणि वरील विषया संदर्भात दि. ३० ऑक्टोबर रोजी आपल्या कार्यालयात होणाऱ्या सुनावणी वेळी बँक बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांना ही कामकाजात सामिल करून घ्यावे. त्या अनुषंगाने तात्काळ आमच्या बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांना याविषयी आम्हांस लेखी कळविण्यात यावे.आणि सर्वसामान्य सभासदांना न्याय देऊन बँक वाचवावी हीच आपल्याकडून अपेक्षा! अश्या प्रकारचे निवेदन आज बुधवारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज चौधरी यांच्याकडे 'दि शिरपुर मर्चंटस को-ऑप बँक बचाव समिती' तर्फे देण्यात आले आहे.या निवेदनावर बँक बचाव समितीचे प्रमुख पदाधिकारी गोपाल कन्हैयालाल मारवाडी, मोहन साहेबराव पाटील, ओंकार चैनसिंग जाधव, हिराभाऊ रामराव कोळी, भरत बाजीराव रोकडे, डॉ सरोजताई डी.पाटील आदींच्या सह्या आहेत.येथे उल्लेखनीय आहे कि कोट्यावधी रुपयांचे नियमबाह्य, विनातारणी कर्ज वितरण केले असल्याचे स्पष्ट झाले असून बँक बचाव समितीच्या जागृत सभासदांतर्फे शिरपुर मर्चंटस को-ऑप बँकेच्या गैरप्रकारांसंबंधी अनेक प्रकरणे उजेडात आणली जाताहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा