धुळे प्रतिनिधी : प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार हे अध्यक्ष असलेल्या धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर तपासणी पथकाने काल पहाटे छापा टाकला आहे. सूतगिरणी व्यवस्थापनासह काही भ्रमणध्वनींसह इतर संपर्क यंत्रणा खंडित करण्यात आली आहे. पथकाने हा परिसर पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतला असल्याची माहिती आहे.केंद्र आणि राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर करुन आपल्या विरोधकांवर भाजपाकडून ईडीसह इतर यंत्रणांचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून कायमच करण्यात येतो. धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून या आधी त्यांना गळाला लावण्याचेही प्रयत्न झाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येते. आमदार कुणाल पाटील यांच्याकडे नऊ वर्षांपासून सूतगिरणीचे अध्यक्षपद आहे. धुळे तालुक्यातील मोराणे शिवारात ही सूतगिरणी आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा