Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३

साक्री तालुक्यातील जि.प.शाळा हट्टी खुर्द च्या मुख्याध्यापक ललिता जाधव/बिरारीस याना प्राईड ऑफ भारत अवार्डने सन्माननीत करण्यात आले



पुणे -पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात घेण्यात आलेल्या 15 वे अखिल भारतीय कर्तव्यम प्रेरणा महासंमेलनात दिनांक 8 ऑक्टोंबर 2023 रोजी ललिता जाधव/बिरारीस यांना श्री  
दिगेंद्र कुमार- महावीर चक्र विजेता भारतीय सेना यांच्या हस्ते गौरविण्यात आले.या वेळी कार्यक्रमाला मा.श्री.कृष्ण प्रकाश, आय.पी.एस.ए.डी.जी.पी.
महाराष्ट्र राज्य,श्री सुनील पवार मा.अप्पर आयुक्त तथा पणन संचालक महाराष्ट्र राज्य श्री.भूषण गोखले, एअर मार्शल भरतीय वायुसेना,श्री संजीव जैन्थ -G20 सचिवालय रोजगार मंत्रालय नवी दिल्ली भारत सरकार  महाराज श्री शिवाजीराजे जाधव,  लखुजीराजे जाधव यांचे वंशज.महाराज श्री विजयसिंह राजे भोसले तंजावर घराण्याचे वंशज श्री अतुल जे.निकम,क्रिडा मंत्रालय, भारत सरकार.व इतर मान्यवर उपस्थित होते.ललिता जाधव /बिरारीस यांची  शैक्षणिक,साहित्यिक,पर्यावरणीय व सामाजिक क्षेत्रातील कर्तव्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या महासंमेलनात भारतातील वीरमाता, वीरपत्नी,शिक्षण,साहित्य,कला,खेळ, संशोधन,इत्यादी क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध राज्यातील मान्यवरांची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले.ललिता जाधव/ बिरारीस यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

तरुण गर्जना वृतपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध