Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
सोनगीर पोलीसांनी गुटख्याचा कंटेनर ट्रक पकडुन कारवाई करुन 48,43,444/- रुपये किंमतीचा मुददेमाल केला हस्तगत...!
सोनगीर पोलीसांनी गुटख्याचा कंटेनर ट्रक पकडुन कारवाई करुन 48,43,444/- रुपये किंमतीचा मुददेमाल केला हस्तगत...!
सोनगिर प्रतिनिधी:- दिनांक 08/10/2023 रोजी कंटेनर ट्रक क्रमांक आर. जे. 11 जी.सी. 4433 हिच्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलले अपायकारक पानमसाला व गुटख्याचा महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याचे उददेशाने दिल्ली कडुन धुळे कडे येत आहे अशी बातमी मिळाल्यावरुन सोनगीर पो.स्टे. चे अधिकारी व कर्मचारी हे सोनगीर टोल नाक्याजवळ जावुन थांबले असतांना दिनांक 08/10/2023 रोजी रात्री 2.00 वा. सोनगीर टोलनाक्यावर सदर वाहन चालकास थांबवून सदर गाडीची तपासणी केली असता त्यात 5 HK नावाचा पानमसाल्याचे 67 मोठ्या गोण्या भरलेल्या मिळून आल्या. सदर वाहनावर कारवाई केली असुन सदर कारवाईत सुमारे 33,43,444 / रुपये किंमतीचा पानमसाला (गुटखा व 15,00,000/- रुपये किंमतीचा कंटेनर ट्रक क्रमांक आर. जे. 11 जी.सी. 4433 असे एकुण असा एकुण 48,43,444/- रुपये किमतीचा मुदद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
सदरबाबत अन्न सुरक्षा अधिकारी श्री. अनिल अरुणराव पवार, अण्णा अँड
औषधप्रसाशन धुळे यांनी सोनगीर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन वाहन चालक दिलीपकुमार बटेश्वरनाथ दुबे वय 43 वर्ष रा. कुसाडा(मधुपुर ) पोस्ट सुरियावा ता. भदोही जि.भदोही (संत रविदासनगर) राज्य उत्तरप्रदेश व माल मालक रिंकूसिंग रा. दिल्ली, माल विकत घेणारे सिंकदर, राजेश वाला व अक्तर रा. मुंबई तसेच वाहन मालक मे. हरी एक्सप्रेस दिल्ली याचे विरुध्द भादवि कलम 328, 188,272,273, 34 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) . (iv) कलम 27 (3) (d), कलम 27 (3) (e) कलम 30 (2) (a) कलम 3(1) (22) (v) चे उल्लंघन केलेले असून कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोसई/ विजय चौरे हे करीत आहेत.
सदर कारवाई मा. श्री. संजय बारकुंड, मा. पोलीस अधिक्षक धुळे, श्री. किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक व साजन सोनवण सो. उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक श्री. विजय. वि. चौरे, पोहेकॉ संजय देवरे, पोना/ अमरीश सानप, पोशि/ राकेश ठाकुर नितीन जाधव, विजयसिंग पाटील यांनी केलेली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा