Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
सांगवी पोलिसांची मोठी कारवाई...! 89 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालासह चालकाला घेतलें ताब्यात...!
सांगवी पोलिसांची मोठी कारवाई...! 89 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालासह चालकाला घेतलें ताब्यात...!
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील आरटीओ चेक पोस्टवर गुटख्याने भरलेला कंटेनर सांगवी पोलिसांनी दोन ऑक्टोबरच्या मध्यरात्री जप्त केला. या कारवाईत दीडशे पोत्यात भरलेला फाइव्ह एचके ब्रँडचा गुटखा व कंटेनर मिळून एकूण 89 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालकाला अटक करण्यात आली.
जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगवी पोलिस ठाण्यात या कारवाईची माहिती दिली. सांगवीचे एपीआय जयेश खलाणे यांना गुट महामार्गावर कंटेनरमधून सुगंधित पानमसाल्याची तस्करी सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांसोबत हाडाखेड येथील आरटीओ चेक पोस्टवर सापळा रचला. संशयित कंटेनर (आरजे 11, जीसी 2809) चेक पोस्टवर आल्यानंतर पोलिसांनी तो थांबवला. त्याच्यामधील मालाबाबत चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी संशयावरुन कंटेनरची झडती घेतली. त्यात गुटख्याचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कंटेनर पोलिस ठाण्यात नेऊन तेथे तपासणी करण्यात आली. त्यात एकूण दीडशे पोती गुटख्याने भरल्याचे आढळले.
गुटख्याची एकूण किंमत 64 लाख 35 हजार रुपये आहे. कंटेनरसह एकूण 89 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून चालक अजितसिंह अमरसिंह (वय 35, रा. नागलादाली ता. सदाबाद जि.महामायानगर, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात अन्न व औषध निरीक्षक किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
सांगवी पोलिस ठाण्यात जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी गुटख्याच्या साठ्याची पाहणी केली. या कारवाईत सहभागी पोलिस पथकाला दहा हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्याचे त्यांनी जाहीर केले. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी , सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप पाटील, हवालदार संजय माळी, पोलिस नाईक संदीप ठाकरे, हवालदार अलताफ मिर्झा यांनी ही कारवाई केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा