Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३
शिरपूर तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर....!
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर, ता. ४ जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (ता. ३) घोषित केला. ६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणुकीची आदर्श आचारसंहितादेखील लागू करण्यात आली आहे.
शिरपूर तालुक्यातील बाभळज, गिधाडे, तरडी, कुरखळी, वाडी खुर्द, नांठे, आमोदे, ताजपुरी, खर्द बुद्रुक, उंटावद, अंतुर्ली, लोंढरे, खामखेडा प्र.थ.,
टेंभेपाडा व उमरर्दा. या १५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे.६ ऑक्टोबरला तहसीलदारांकडून निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणूक अर्ज मागविणे व सादर करणे या प्रक्रियेसाठी १६ ते २० ऑक्टोबर ही मुदत आहे. २३ ऑक्टोबरला प्राप्त अर्जांची
छाननी करण्यात येणार आहे.
माघार घेण्यासाठी २५ ऑक्टोबर ही अखेरची मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी तीन नंतर निवडणूक चिन्हांचे वितरण करून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदानाची गरज भासल्यास ५ नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबरला विहित ठिकाणी करण्यात येणार आहे. निवडणूक निकालाची अधिसूचना ९ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे,अशी माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा