Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
पोलिसांच्या साक्षीने शिरपूर तालुका बनतोय गांजाशेती, दारू, गुटखा तस्करीचे मोठे केंद्र थाळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत झालेली पहिली मोठी कारवाई ; आरोपी फरार
पोलिसांच्या साक्षीने शिरपूर तालुका बनतोय गांजाशेती, दारू, गुटखा तस्करीचे मोठे केंद्र थाळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत झालेली पहिली मोठी कारवाई ; आरोपी फरार
कधीकाळी रॉकेलच्या काळ्याबाजारामुळे कुप्रसिद्ध असलेल्या धुळे जिल्ह्याने अलीकडे शेतीतून बेमालूमपणे गांजाचे पीक घेत गुन्हेगारी जगतात आपली नवी कुप्रसिद्ध मिळविली आहे. जोडीला बनावट दारू, गुटखा, जनावरांची अवैध वाहतूक आणि अन्य अवैध धंदेही असल्यानेच जणू जिल्ह्यात व शिरपूर तालुक्यात पोस्टिंग मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांची स्पर्धा पाहायला मिळते. म्हणूनच अधूनमधून होणारी पोलिसांची कारवाई ही महिन्यातील कारवाईचे केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठीच असते. मूळ गुन्हेगारीला मूठमाती देण्यासाठी नव्हे हे ही अधोरेखित झाले आहे. खरं तर धुळे हा चार तालुक्याचाच जिल्हा. परंतू मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सुवर्ण त्रिकोणाच्या सीमा आणि दळणवळण हे जसे उद्योग, व्यवसायांसाठी फायद्याचे ठरतात, त्याहून अधिक फायदा अवैध धंद्यांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो असा आजवरचा अनुभव आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर हे आदिवासी बहुल तालुका आहे. आणि या तालुक्याचा सीमा मध्यप्रदेश राज्याला जोडणारा आहे. सातपुडा पर्वताच्या रांगा आणि उरलीसुरली जंगल, झाडी व दऱ्याखोऱ्या घाट रस्ते अशा एकूणच भौगोलिक स्थितीचा अधिकाधिक फायदा गुन्हेगारी क्षेत्रातल्या लोकांनी घेतला आहे. एक राज्यात गुन्हा केला की शेजारच्याच राज्यात दडून
बसायला गुन्हेगारांना सोपे आहे. अशा गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी करावी लागणारी कायदेशीर कसरत आणि त्यात जाणारा वेळ हे सगळंच गुन्हेगारांच्या पथ्यावर पडते.
शिरपूर तालुक्यातील बभळाज शिवारातील भिवखेड पाडा येथील गांजाचे शेतावर कारवाई करुन एकूण ४९,९९, ३६५ /- रुपये किंमतीचा १४२८.३९० किग्रॅ वजनाचे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतीचे झाडे जप्त करण्यात थाळनेर पोलीसांना यश आले आहे दि.१८ रोजी मा. सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो. शिरपुर विभाग, शिरपुर यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, भिवखेड पाडा बभळाज शिवार येथे एक इसम तो कसत असलेल्या त्याचे ताब्यातील वन जमिनीवरील शेतात मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा अंमली पदार्थ (गांजा) ची बेकायदेशीररित्या लागवड केली आहे. त्याबाबत त्यांनी पुढील कारवाई करणे बाबत थाळनेर पो.स्टे. प्रभारी अधिकारी सपोनि. दिपक पावरा यांना प्राधिकार पत्र देऊन आदेशीत केले. त्यावरुन सहा.पोलीस निरीक्षक दिपक पावरा यांनी सदर बातमीची माहिती मा. पोलीस अधीक्षक, धुळे, मा. अपर पोलीस अधीक्षक, धुळे यांना कळवून छापा कारवाईची परवानगी घेऊन त्यानुसार छापा कारवाईकामी मा. सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपुर विभाग, शिरपुर, राजपत्रित अधिकारी श्री. महेश साळुंके, नायब तहसीलदार शिरपूर, दोन शासकीय पंच, वजनकाटाधारक, फोटोग्राफर तसेच थाळनेर पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह बभळाज भिवखेड पाडा ता. शिरपूर जि.धुळे शिवारात जाऊन शोध घेऊन १६.१० वाजेच्या सुमारास इसम नामे मुसा मालसिंग पावरा, रा. महादेव ता. शिरपुर जि. धुळ ह.मु. भिवखेडपाडा बभळाज शिवार ता. शिरपुर हा कसत असलेल्या वनजमिनीचे शेतात छापा टाकला असता त्या शेतात भुईमुंग व तुरीचे पिकात मध्यभागी गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतींच्या झाडांची लागवड करून शेती केलेली दिसली. सदर इसम शेतात मिळून आला नाही. त्याचे शेतात मिळून आलेल्या एकूण ४९, ९९, ३६५/- रुपये किंमतीचा १४२८. ३९० किग्रॅ वजनाचे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतीचे झाडे जप्त करुन त्याचे विरुद्ध पोहेकॉ १०८६ शामसिंग कर्मा वळवी यांनी फिर्याद दिल्यावरुन गुंगीकारक औषधीद्रव्ये व मानवी मेंदुवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ कलम २० व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पावरा हे करीत असून सदर गुन्ह्यातील फरार आरोपीताचा शोध घेणे सुरु आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, श्री. किशोर काळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो., श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक थाळनेर पो.स्टे प्रभारी श्री. दिपक पावरा, पोहेकॉ १०८६ शामसिंग वळवी, पोहेकॉ ४०४ संजय धनगर, पोना ०७ भुषण रामोळे, पोकॉ १६३३ उमाकांत वाघ, पोकों १६९६ किरण सोनवणे, पोकॉ ५५६ दिलीप मोरे, पोकॉ ६७६ प्रविण गोसावी, पोकॉ ५२७ भाऊसाहेब मालचे, होमगार्ड राकेश कोळी, राहुल कोळी, सुकदेव कोळी, पंकज धनगर तसेच आर.सी.पी. पथक शिरपुर अशांनी मिळून केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा