Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
गुटख्याचे वाहन सोडले दिल्याप्रकरणी पहूरच्या फौजदारासह हवालदाराचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अखेर केले निलंबन...!
गुटख्याचे वाहन सोडले दिल्याप्रकरणी पहूरच्या फौजदारासह हवालदाराचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अखेर केले निलंबन...!
जामनेर प्रतिनिधी :- पहूर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्ने व हवालदार किरण शिंपी यांना गुटख्याचे वाहन सोडून दिल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बुधवारी निलंबित केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून हे वाहन पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्ने व हवालदार अमोल शिंपी यांनी 16 ऑक्टोबर रोजी रात्री पकडले होते. या वाहनावर कारवाई न करता ते साडून देण्यात आल्याची बाब उजेडात आल्यानंतर पोलिस दलावर टिकेची झोड उठली. पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक, हवालदार यांच्याबाबत पहूर पोलिस ठाण्याकडून कसुरी अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठवण्यात आल्यानंतर त्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्याकडे देण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा