Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपणारे,धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेबांनी शिकविलेल्या जनसेवेच्या मार्गावर चालणारे,राज्याचे लोकप्रिय कार्यसम्राट अनाथांचे नाथ मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार,
धुळे जिल्हा शिवसेनेची शिरपूर तालूका कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.
१) मनोज भिका धनगर
शिवसेना शहर प्रमुख
२)कन्हैया बाबुराव चौधरी
 शिवसेना तालुका प्रमुख पश्चिम
३)दिपक श्यामसिग जमादार
 शिवसेना तालुका प्रमुख पूर्व
४)संजय भगवान पाटील
वैद्यकीय तालुका अध्यक्ष
५)प्रवीण प्रल्हाद धनगर(बंटी)
  शिवसेना शहर सघटक 
६)डॉ गणेश  वामनराव वाडीले
शिवसेना शहर समन्वयक.
७) दिनेश कांतिलाल गुरव-युवा सेना शहर अधिकारी. 

यांच्या नियुक्तीचे पत्र मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आले.
सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे खा.श्रिकांतजी शिंदे साहेब,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.दादाजी भूसे साहेब,शिवसेना प्रदेश सचिव मा.भाऊसाहेब चौधरीलोकसभा संपर्क प्रमुख मा.चंद्रकांतजी रघुवंशी साहेब,साक्री विधानसभेच्या आमदार सौ.मंजूळाताई गावीत,शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख मा.सतिष तात्या महाले,ज्येष्ठनेते विजय अग्रवाल, माजी नगर सेवक राजूनाना चौधरी,ललित भाऊ चौधरी,धिरज मोकले यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी संबोधन करतांना जिल्हाप्रमुख सतिषतात्या महाले यांना मंगळवार दि.२४अॉक्टोबरला आझाद मैदानावर होणार्या दसरा मेळाव्याला हजारोंच्या संख्येने वाजत गाजत येण्याचे आवाहन करीत येणार्या निवडणूका डोळ्यापुढे ठेवून कंबर कसून कामाला लागा असे सांगितले.
या प्रसंगी शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख सतिषतात्या महाले यांनी धुळे जिल्ह्यातून हजारों शिवसैनिक दसरा मेळाव्या निमित्ताने आपल्या विचारांचे सोने लूटण्यास उपस्थित राहतील अशी ग्वाही दिली.असे उपजिल्हा कार्यालय प्रमुख विजय अग्रवाल यांनी कळविले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध