Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
बेकायदा वाहन विक्रेता फायनान्स कंपनी व आरटीओ यांच्या मिलीभगतमुळे निष्पाप व्यक्तीचा दिला जातो बळी नेमके जबाबदार कोण? नवकार ऑटो होळनाथे की श्रीराम फायनान्स कंपनी?
बेकायदा वाहन विक्रेता फायनान्स कंपनी व आरटीओ यांच्या मिलीभगतमुळे निष्पाप व्यक्तीचा दिला जातो बळी नेमके जबाबदार कोण? नवकार ऑटो होळनाथे की श्रीराम फायनान्स कंपनी?
शिरप र तालुक्यातील बभळाज या गावाजवळ एका मोटारसायकलचा व आयशर गाडीचा अपघात होऊन मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातातील मोटारसायकलची पासिंग देखील झालेली नव्हती. खरे पहाता वाहन कायद्यानुसार विक्री झालेल्या वाहनाचे वाहन शोरुम मधून बाहेर काढून देण्यापुर्वीच त्या वाहनाची पासिंग होऊन नंबर प्लेट दिलेली पाहिजे. सदर वाहन हे खरेदी करतांना श्रीराम फायनान्स या कंपनीने फायनान्स केलेला आहे.
म्हणजेच वाहन घेतल्यानंतर लागलीच फायनान्स कंपनी वाहन मालकाचा थर्ड पार्टी विमा काढला जातो. त्यात १५ लाख रक्कमेचा वाहन मालकाचा विमा असतो. शिरपूर तालुक्यातील नवकार ऑटो होळनाथे हे बेकायदा वाहन विक्रेते आहेत. व अश्या ठिकाणी या फायनान्स कंपनीला फायनान्स करण्याचा अधिकार आहे काय ? फायनान्स हा केवळ अधिकृत शोरुम मध्येच करता येतो. बेकायदा वाहन विक्रेत्याच्या शोरुम मध्ये श्रीराम फायनान्स कंपनीने फायनान्स केला तरी कसा ? कोणत्या कायद्यांने ? आणि याचमुळे सदर वाहन मालकाचा परिवार ह्या १५ लाख रुपायाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहिला आहे.
मात्र बेकायदा वाहन विक्रेते, फायनान्स कंपनी व आरटीओ त्यातच स्थानिक पोलिस प्रशासन हे सर्वांची मिलीभगत असल्याने हकनाक निष्पाप व्यक्तीचा बळी दिला जात आहे. व हा प्रकार सदोष मनुष्य वधात येतो. याची या अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारची महिती असतांना देखील सर्वच यंत्रणा आपल्या बाजूने असल्याने आपले कोणीच काही वाकडे करणार नाही. म्हणून राजरोसपणे हे बेकयदा शोरूम व फायनान्स कंपनीचे दुकाने चालत आहेत. मात्र वृत्तमिडीया हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. तो कसा शांत बसणार.. आता मात्र हे
बेकायदा वाहन विक्रेत्यांचे बेकायदा शोरुम व त्यात नियमबाह्य फायनान्स कंपनीचे दुकाने हे बंद झालीच पाहिजे. पोलिस प्रशासनाने व जागरुक नागरीकांनी आणि स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांनी देखिल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. व आपल्या हद्दीतील असे बेकायदा वाहन विक्रेत्यांची दुकाने बंद करावीत. यदा कदाचित यामुळे भविष्यातील आपल्या गावातील, आपल्या घरातील एखाद्याचे जाणारे प्राण वाचविता येऊ शकतो.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा