Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

शिरपूर तालुका पोलीसाची गांजा शेतीवर मोठी कारवाई...!



शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि.11 ऑक्टोबर 2023 रोजी गांजा शेतीवर धडक कारवाई करत मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.
बुडकीविहीर गावाचे शिवारात विठ्ठल बारक्या पावरा याने त्याच्या वनजमिनीत मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारा गांज्या सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीची बेकायदेशीरपणे लागवड करुन चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाढविले आहेत. अशी बातमी मिळाल्यावरुन सपोनि श्री जयेश खलाणे यांना लागलीच माननिय पोलीस अधिक्षक  धुळे यांची सदर ठिकाणी जावुन कार्यवाही करण्याची परवानगी घेवून तहसिल कार्यालय शिरपुर येथील राजपत्रीत अधिकारी  अधिकार बाळकृष्ण पेंढारकर निवासी नायब तहसिलदार शिरपुर, पंच वजनकाटा धारक, फोटोग्राफर, व पोलीस स्टाफ सह बुडकीविहीर गावाचे शिवारात जाऊन  बातमीनुसार इसम नामे विठ्ठल बारक्या पावरा राहणार बुडकीविहीर तालुका शिरपर जिल्हा धुळे हा कसत असलेल्या शेताचा शोध घेतला असता एका शेतात गांजा आमली पदार्थ वनस्पतीची लागवड केलेली दिसली. 

सदर ठिकाणी छापा टाकताच पोलीस आल्याची चाहुल लागताच शेती कसत असलेली इसम हा तेथुन पसार झाला. सदर ठिकाणी कोणताही इसम मिळुन न आल्याने तेथे पोलीस पाटील सुनिल शिवदास पावरा यास बोलावून राजपत्रित अधिकारी व पंचासमक्ष सदर शेत कोण कसत आहे बाबत विचारले असता सदर शेत विठ्ठल बारक्या पावरा रा. बुडकीविहीर तालुका शिरपूर हा कसत आहे असे सांगीतले.पोलीस पाटील यांस सोबत घेवून तो कसत असलेल्या शेताची पाहणी करता सदर शेतात मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणारा गांज्या सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीची बेकायदेशीरपणे लागवड केलेली दिसून आली सदर क्षेत्रामध्ये सुमारे पाच ते सहा फुट पावेतो कमी अधिक उंचीचे झाडांची लागवड केलेली असून सदर झाडे हिरवेगार ताजे उभे असलेले दिसले. सदर शेतातील गांज्या सदृश्य अंमली पदार्थांच्या वनस्पती मुळासकट उपटून त्यांचे वजनकाटा धारक यांनी सदर झाडांची वजनमापे घेतली असता एकुन 32,55,0000 रु.कि.चे एकूण 930 किलो वजनाचा गांजा सदृश्य आमली पदार्थाचे हिरवे ओले ताजे झाड, पाने, फुले व फांदया असलेले मुळासह, मुळापासून ते शेडया पर्यंत उंची अंदाजे पाच ते सहा फुटापर्यंत कमी जास्त असलेले मुळास थोडी माती लागलेली प्रति किलो 3500 रुपये दराचे अंदाजे. सदर झाडांचे 30 किलो वजनाचे वेगवेगळे  एकतीस गठठे करून कापडात भरून ते दोरीने बांधून सिलबंध केले. याबाबत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड ,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे , उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे,पोलीस निरीक्षक संदीप पाटील, कृष्णा पाटील, श्रीमती मंगला पवार, व पोलीस कर्मचारी चत्तरसिंग खसावद, आरिफ पठाण, शेखर बागुल, रोहीदास पावरा, राजेश्वर कुवर, जयेश मोरे,योगेश मोरे, शिवाजी वसावे, कृष्णा पावरा, अल्ताफ मिर्झा, मनोज पाटील यांनी केलेली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध