Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातून सर्व जनतेला न्याय देण्याचे काम यशस्वीपणे सुरु, - शिरपूर आमदार कार्यालयात भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली विविध विषयांवर माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातून सर्व जनतेला न्याय देण्याचे काम यशस्वीपणे सुरु, - शिरपूर आमदार कार्यालयात भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली विविध विषयांवर माहिती
शिरपूर : येथील आमदार कार्यालयात भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टी मार्फत देशभरात व राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल तसेच विविध विषयांवर सविस्तर माहिती दिली.
आमदार कार्यालय, करवंद रोड शिरपूर येथे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपा विभाग संघटन मंत्री रविंद्र अनासपुरे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, शिरपूर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभाकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत 11 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकीर्द मुळे देशाचे नाव संपूर्ण जगभरात अभिमानाने घेतले जात आहे. लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत देशभर भाजपाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यभर, उत्तर महाराष्ट्र, अनेक ठिकाणी दौरे सुरु करत आहेत. त्यानिमित्त 100 सुपर वॉरियर नियुक्ती, बूथ अभियान प्रभावीपणे राबवणे, तसेच पक्षाकडून अनेक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम सुरु आहे. सुपर वॉरियर यांची भूमिका मोठी राहणार आहे. घर घर संपर्क अभियान, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पाठिंबा, माटी को नमन शहिदों को वंदन, विविध प्रकारे राष्ट्रीयत्वाची भावना व्यक्त केली जाईल, माती कलश संपूर्ण महाराष्ट्र तून दिल्ली वाटिका येथे जाईल. त्याग, समर्पण भावना यात आहे. माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आ. काशीराम पावरा व भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सरल ऍप ची शिरपूर विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे कामगिरी पार पाडल्या बाबत भाजपाकडून महाराष्ट्रभर कौतुक केले जात आहे. भाईंचे कार्य महान असून त्यांनी आमदार कार्यालयात राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्षपणे तालुक्यातील हजारो नागरिकांना मिळवून दिल्याची बाब खूपच कौतुकास्पद आहे. आयुष्मान कार्ड वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान कार्ड योजना, बांधकाम कामगार योजना, पिक विमा 2400 शेतकरी यांना 22 कोटी रुपये लाभ, अशा असंख्य शासकीय योजनांमधून तालुक्यातील जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे काम अविरत सुरू आहे ही प्रेरणादायी बाब आहे. राज्यात भाईं चे कार्य कौतुकास्पद आहे. विश्वकर्मा योजना 12 बलुतेदार साठी नव्याने पंतप्रधान मोदीजी यांनी सुरु केली असून भाजपा तर्फे प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रगत राष्ट्र बनविण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्याकडे सत्ता देऊन नागरिकांनी भाजपाच्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
विभाग संघटन मंत्री रवींद्रनासपुरे यांनीही भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणाबाबत सविस्तर विवेचन करून सरल अॅप, नमो अॅप, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक यावर सक्रिय राहण्याचे कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांना आवाहन केले. लोकसभा 45 प्लस व विधानसभा 155 प्लस जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी प्रास्ताविक केले तर शिरपूर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभाकरराव चव्हाण यांनी आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा