Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
मंडळ अधिकारी यांना 2000 रुपयांची लाच भोवली....! शिरपूर तालुक्यातील मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात...!
मंडळ अधिकारी यांना 2000 रुपयांची लाच भोवली....! शिरपूर तालुक्यातील मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात...!
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील लोकसेवक मुकेश श्रीकांत भावसार, मंडळ अधिकारी, भाग जवखेडा, तहसिल कार्यालय, शिरपूर यांनी तकारदार यांचेकडे २,०००/- रु लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम तकारदार यांच्याकडून स्विकारल्याने त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
तकारदार यांच्या वडीलांच्या नावे मौजे वारूळ, ता. शिरपूर जि.धुळे येथे गट नं. १७५/१अ/०१ व गट नं.१७५/१/०२ अशी शेत जमीन असुन सदरची शेत जमीन तकारदार व त्यांची बहीन यांच्यात वाटणी करून देणे बाबत शिरपूर येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने आदेश दिल्याने तकारदार यांनी मा. न्यायालयाच्या आदशाची प्रत जोडून मा. तहसिलदार, शिरपूर यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशाने शेत जमीन नावे करून देणे बाबत दि. ३०.०८.२०२३ रोजी अर्ज जमा केला होता. त्यावरून मा. तहसिलदार, शिरपूर यांनी सदरचा अर्ज पुढील कार्यवाही करीता दि.१२.०९.२०२३ रोजी तलाठी बरूळ यांच्याकडे पाठविला होता. त्याप्रमाणे तलाठी व मंडळअधिकारी यांनी तक्रारदार यांचे अर्जावर कार्यवाही करून शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर नावे लावण्याचे काम करून दिले होते.
त्यानंतर मुकेश भावसार, मंडळ अधिकारी, भाग जवखेडा यांनी तक्रारदार यांना मोबाईलवर फोन करून त्यांचे शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावरचे नावे लावण्याचे काम करून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणुन त्यांच्याकडे २,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दुरध्वनी वरून माहीती दिली होती. सदर माहीती वरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिरपूर येथे जावुन तकारदार यांची भेट घेवुन त्यांची तक्रार नोंदवुन सदर तकारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता मुकेश भावसार, मंडळ अधिकारी, भाग जवखेडा यांनी तकारदार यांचेकडे २,०००/- रु पंचासमक्ष लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम लागलीच स्विकारल्याने त्यांना आज दि. ०२.११.२०२३ रोजी शिरपूर येथुन ताब्यात घेवुन त्यांचे विरूध्द शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक श्री. अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण मोरे मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, सुधीर मोरे यांनी केली आहे. सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा