Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३
शिरपूर तालुका कृषी विक्रेत्या संघटनेच्या अध्यक्षपदी हेमंत चौधरी यांची निवड...!
शिरपूर(प्रतिनिधी) माफदा संलग्नित शिरपूर तालुका सीड्स पेस्टि साईडस् व फर्टीलायझर्स डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी थाळनेरचे हेमंत चौधरी व उपाध्यक्षपदी शिरपूरचे गौरव अग्रवाल यांची निवड नुकतीच करण्यात आली.
माफदा संलग्नित शिरपूर तालुका सीड्स,पेस्टीसाईडस् व फर्टीलायझर्स डीलर्स असोसिएशनची बैठक माता चे सचिव राजेंद्र भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
यावेळी तालुक्यातील नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी थाळनेरचे पत्रकार हेमंत चौधरी, उपाध्यक्षपदी शिरपूरचे गौरव अग्रवाल, सचिव भूपेश अग्रवाल, खजिनदार निलेश अग्रवाल, सदस्य गोपाल पाटील, राजेश पगारे,आशिष अग्रवाल, लक्ष्मण पाटील, मंगेश भदाणे, विशाल भंडारी, ललित जाधव, योगेश पाटील, दिलबर बेहरे, जितेंद्र पाटील आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली. विद्यमान संचालक मावळते अध्यक्ष ओंकारसिंग जाधव यांच्याही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भारुड व एकपात्री नाटकाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील कृषी विक्रेते संजय पाटील, उज्वल निकम, लालाराम जाट, लहेरचंद धनजी,अनिल अग्रवाल, राजेंद्र जाधव,नामदेव धनगर,दिनेश पाटील, लखन मराठे,विवेक पाटील, जयपाल राजपूत,जितेंद्र संचेती, नागराज पाटील, मोहित अग्रवाल मनीष करणकाळ व तालुक्यातील बहुसंख्य कृषी विक्रेते उपस्थित होते. सूत्रसंचालन पी टी पाटील यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा