Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३
थाळनेरच्या शिक्षकाचा मोटर सायकल अपघातात मृत्यू
थाळनेर (प्रतिनिधी)थाळनेर शिरपूर रस्त्यावर दिवाळीचा बाजार करून घरी येत असताना शिक्षकाच्या मोटरसायकलीस समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे दुःखद निधन झाले.
याबाबत थोडक्यात वृत्त असे की मयूर सुकलाल धनगर (निळे) वय ३४ राहणार थाळनेर तालुका शिरपूर हे शहादा तालुक्यातील हिंगोनीं गावात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यामुळे दिवाळीच्या फराळाचे सामान खरेदी करण्यासाठी शिरपूर येथे दि.८/११/२३ रोजी दुपारी गेले होते. दिवाळीच्या फराळाचा सामान खरेदी करून ते स्वतःची मोटरसायकल MH18 AR8966 ते थाळनेर येथे येत होते. जैतपुर फाट्याजवळ शिरपूर कडे जाणाऱ्या ट्रॅक्टर MH18 BX 4764 समोरून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली.
या अपघातात मयूर धनगर यांच्या मेंदूस मार लागला. त्यांना पुढील उपचारासाठी शिरपूर व तेथून धुळे येथे घेऊन जात असताना सोनगीर गावाजवळ त्यांची प्राणजोत मालावली. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात थाळनेर येथील तापी नदी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील ,मोठा भाऊ, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा