Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ नोव्हेंबर, २०२३
धुळे वार्ताहर : दरखेडा (ता. शिंदखेडा) येथील बुराई नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन करून सुमारे दहा हजार ब्रास वाळू अवैध उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी बाभुळदे (ता.शिंदखेडा) येथील माजी सरपंच विलास निंबा शिंदे यांना २२ कोटी २८ लाख ६६ हजार ८०० रुपयांची दंडाची नोटीस शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी गुरुवारी (ता.९) सायंकाळी बजावली. दरखेडा गावालगत असलेल्या बुराई नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक थांबविण्याबाबतची तक्रार दरखेडा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, अव्वल कारकून संजय राणे, मंडळ अधिकारी नीलेश मोरे व अवैध गौणखनिज भरारी पथक यांनी पाहणी केली असता दहा हजार ब्रास अवैध वाळू उत्खनन व वाहतूक केल्याचा पंचनामा दरखेडा ग्रामस्थांसमक्ष करण्यात आला.
त्यामुळे दहा हजार ब्रास अवैधरीत्या वाळू उत्खनन करून वाहतुकीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार २२ कोटी २८ लाख ६६ हजार ८०० रुपये दंड आकारण्याची नोटीस माजी सरपंच विलास निंबा शिंदे यांना बजावण्यात आली.
नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत समक्ष हजर राहून खुलासा करण्याचे आदेश नोटिशीत देण्यात आले आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा