Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
अनेर डॅम परिसरातील आदिवासी बांधवांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू व मिठाई वाटप....एस.एन.आर.जी.इंग्लिश मीडियम स्कूलचा अनोखा उपक्रम.
अनेर डॅम परिसरातील आदिवासी बांधवांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू व मिठाई वाटप....एस.एन.आर.जी.इंग्लिश मीडियम स्कूलचा अनोखा उपक्रम.
घोडगाव (गलंगी- वार्ताहर) येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस.एन. आर .जी. इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने दिवाळी सणानिमित्त अनोखा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.अनेर डॅम परिसरातील आदिवासी पाड्यातील बांधवांना भेटवस्तू व आदिवासी विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.आदिवासी बांधवांना कपडे, ब्लॅंकेट, बूट ,चप्पल वाटप करण्यात आले. आदिवासी मुलांना कपडे, शैक्षणिक साहित्य , मिठाई वाटप करुन त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलवले.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रासहासभाई गुजराथी, संचालक मंडळ यांची प्रेरणा व मार्गदर्शन या उपक्रमासाठी लाभले. एस.एन.आर.जी.इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्रीमती जेनिफर साळुंखे, कल्पेश साळुंखे, मेहुल पाटील व शिक्षक स्टाफच्या हस्ते भेटवस्तू व मिठाईवाटप करण्यात आली.
या निमित्ताने आदिवासी संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांना करून देण्यात आले. याप्रसंगी अनेर डॅम परिसर व निसर्ग दर्शनाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. या उपक्रमामुळे आदिवासी बांधवांची दिवाळी गोड झाली.आदिवासी बांधवांनी संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, संचालक मंडळ, एस. एन. आर.जी. इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य व शिक्षक वृंदांचे आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा