Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहर शोध पथकाची कौतुकास्पद कामगिरी...! घरफोडी चोरी ज्वेलरी शॉप व एटीएम चोरीतील सराईत गुन्हेतील दोन फरार तर तीन जेरबंद...
शिरपूर शहर शोध पथकाची कौतुकास्पद कामगिरी...! घरफोडी चोरी ज्वेलरी शॉप व एटीएम चोरीतील सराईत गुन्हेतील दोन फरार तर तीन जेरबंद...
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरात गुन्हेगारीच्या उद्देशाने व घरपोडी,एटीएम फोडण्यासाठी अथवा दरोडाच्या उद्देशाने दाखल झालेल्या ०३ सराईत गुन्हेगारांना शिरपूर शहर शोध पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयावरून अटक केल्याने शहरातील मोठा अनर्थ टळला आहे. शिरपूर शहर शोध पथकाच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की शोध पथकाचे कर्मचारी दिनांक 01 नोव्हेंबरच्या रात्री दीड वाचेच्या सुमारास गस्त घालत असताना शनी मंदिराकडून शिरपूर शहराकडे एका पांढऱ्या रंगाची इको कार येताना दिसल्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कारचालकाने पोलीस गाडी येत असल्याचे पाहून ती खर्दे गावाकडे वळून पोलिसांना हुलकावणी देत खर्दे गावाच्या कॉलनीतून तसेच खर्दे उंटावद गावातून पळून जाण्याच्या प्रयत्न केला म्हणून पोलिसांनी 112 वर कॉल करत आपल्या अधिकाऱ्यांना तात्काळ बोलवून घेत सदरची गाडी सावडदे गावाजवळ पकडली. या गाडीची तपासणी केली असता त्यात घातक शस्त्र तलवार, चाकू ,धारदार कटर, लोखंडी कटर, ट्यामी , स्कू चाबी,
हातोळा पेंचीस, पोपट पाना, बॅटरी, मिरची पूड ,दोरी व दगड असे साहित्य संशयादस्पद रित्या मिळून आले. त्यामुळे सदरचे आरोपी हे शहरांमध्ये चोरी घरपोडी अथवा दरोडेच्या उद्देशाने आल्याचे निष्पन्न झाले. म्हणून गाडीतील आरोपी 1)मुकंदरसिंग निक्कासिंह टाक वय 38 राहणार बीवी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा 2) तकदीरसिंह टिटूसिंह टाक वय 24 राहणार मंगल बाजार जालना 3)कलदारसिंग निक्कासिंह टाक वय 55 राहणार गुरू गोविंद नगर जालना असे मिळून आले असून त्यांचे दोन साथीदार अंधाराच्या फायदा घेऊन पसार झाले आहेत. त्यामुळे मिळालेल्या मुद्देमालासह आरोपींना अटक करून पोलिसांनी इको कार सह ०५ लाख ०५ हजार ६२० रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींच्या ताब्यात मिळून आलेली मारुती सुझुकी इको कार क्रमांक एम एच 39 ए.बी 81 93 हे वाहन देखील श्रेयस कॉलनी तळोदा जिल्हा नंदुरबार येथून चोरी केल्याचे आढळून आले असून याबाबत तळोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
यातील आरोपी क्रमांक १) मुकंदरसिंग निक्का सिंग टाक याच्यावर विविध कलमान्वये सिंदखेड राजा ,मंठा कदिम, जालना येथील विविध पोलीस ठाण्यात ०५ गुन्हे दाखल असून औरंगाबाद येथे देखील ०२ गुन्हे दाखल आहेत. त्यावर असे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. त्यात ०८ घरपोडीचे ०१ दरोडाच्या व ०२ चोरीचे अशा गुन्हेचा समावेश आहे.
आरोपी क्रमांक २) तकदीरसिंह टाक
याच्यावर औरंगाबाद येथील विविध पोलीस ठाण्यात ०५ गुन्हे दाखल असून त्यासोबत बुलढाणा ,जालना, करमाळ, पारद , असे एकूण १२ गुन्हे दाखल असून त्यात ०८ घरपोडी ०३ चोरी व ०१ आत्महत्या करण्याच्या प्रयत्न अशा गुन्हे चा समावेश आहे.
आरोपी क्रमांक ३) कलदारसिंग निक्कासिंग टाक जालना येथील विविध पोलीस ठाण्यात ०३ गुन्हे दाखल असून मालेगाव येथी देखील गुन्हा दाखल आहे. या आरोपीवर एकूण ०४ गुन्हे दाखल असून त्यात घरपोडी व एनडीपीएस अशा गुन्ह्यांचा समावेश आहे .
सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून ते घर फोडी, चोरी, ज्वेलरी शॉप फोडणे, एटीएम फोडणे ,बँक रॉबरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करण्यात सराईत आहेत असे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर आरोपींकडून तळोदा येथील चोरी केलेली इको कार किंमत ०५ लाख रुपये व गुन्ह्यासाठी तयारीत असलेल्या चीज वस्तू यांची किंमत ०५, ६२० असा एकूण ०५ लाख ०५ हजार ६२० रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना जेरबंद करत शहर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
पोलिसांच्या या सतर्कतेमुळे शहरावरील संभावित संकट टळले असून असून वरील आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ०३ दिवसांची पोलिस कस्टडी रिमांड देण्यात आले आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश कुटे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शिरपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक एस एस आगरकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे व शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल ललित पाटील ,रवींद्र आखडमल ,विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे ,प्रशांत पवार, मनोज दाभाडे ,भटू साळुंखे ,सचिन वाघ , आरीफ तडवी, मनोज महाजन, रोहित राज गांगुर्डे ,विवेकानंद जाधव, चालक पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र मालचे, रवींद्र महाले तसेच होमगार्ड मिथुन पवार ,राम भी, चेतन भावसार, शरद पारधी इत्यादींच्या पथकाने केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा