Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३

दहिवेल येथे श्री.अनिल दादा देसले,श्री.संजय बच्छाव,श्री.डोंगरु बहिरम यांचे सुरू असलेले अन्नत्याग अमरण उपोषण अखेर मा.आ.सौ.मंजुळाताई गावित यांच्या आश्वासनाने मागे....



अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.प्रदीप पाटील (बाबा) खंडापूरकर व महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.भारत दिघोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने साक्री तालुक्यातील दहिवेल येथे साक्री तालुका सरसकट दुष्काळ जाहीर करावा,कुषी पंप विजबिल माप करावे.नियमित कर्ज फेडकरणा-या शेतकरी यांना ५०,००० रू. अनुदान मिळावे इत्यादी मागण्यासाठी दि :०२/११/२०२३ पासून दहीवेल ता.साक्री जि.धुळे येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नत्याग अमरण उपोषणास संघटनेचे पदाधिकारी१) संजय कालेश्वर बच्छाव तालुका अध्यक्ष (कांदा उत्पादक संघटना) जिल्हा कार्याध्यक्ष (अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती)२) अनिल लोटन देसले प्रदेश अध्यक्ष निवड समिती (अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती)३) डोगरू जिभाऊ बहीरम जिल्हा अध्यक्ष आदिवासी सेल (अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती) बसलेले तसेच या उपोषणात दि:०२ तारखेपासून प्राजक्ता ताई देसले (प्रदेश अध्यक्ष महिला विभाग),श्री.प्रवीण दादा बोरसे(प्रदेश सेक्रेटरी),करुणाताई पाटील (जिल्हा अध्यक्ष परिवहन विभाग),श्री.तुळशीराम जगताप (जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी सेल),श्री.जितेंद्र बच्छाव(जिल्हाध्यक्ष अध्यात्मिक आघाडी) श्री.सुरेश महिरे(तालुका सहसंघटक),राहुल भामरे(तालुका उपाध्यक्ष)श्री. दीपक भामरे(तालुका संघटक)तसेच दहिवेल परिसरातील तमाम शेतकरी बांधव उपोषणात सहभागी झाले आहेत.या उपोषणास दि:०३/११/२०२३ रोजी दुपारी११:३० वाजता साखरी तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री.साहेबराव सोनवणे व साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री. मोतीराम निकम साहेब यांनी भेट दिली . यादरम्यान तहसीलदार साहेबांशी व निकम साहेबांशी जवळपास एक तास चर्चा झाली. तालुक्यातील जवळजवळ बऱ्याच मंडळातील गावांची अनेवारी ही ५०% हून कमी दाखवून सदर अहवाल शासनास सादर करण्यात येईल असे तहसीलदार मा.श्री.सोनवणे साहेब यांनी सांगितले तसेच आपण उपोषण मागे घ्यावे असे सांगितले. परंतु उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत लोकप्रतिनिधी येऊन चर्चा करत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहील असे सांगितले.मा श्री तहसीलदार माननीय आमदार ताईंना फोन लावून सांगितले.आमदार ताईंनी उपोषण करते श्री अनिल दादा देसले यांच्याशी चर्चा करून सांगितले की मी ४:०० वाजेपर्यंत दहिवेल येथे आपल्याला भेटावयास येते. बरोबर ४:०० वाजेच्या सुमारास साक्री तालुक्याच्या लाडक्या आमदार सौ.मंजुळाताई गावित ह्या उपोषण स्थळी दाखल झाल्या.यावेळी माननीय श्री.बी.एम.भामरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तदनंतर उपोषण करते श्री.अनिल दादा देसले, श्री.संजय दादा बच्छाव व श्री.डोंगरू दादा बहिरम यांच्याशी बऱ्याच वेळ चर्चा करून आपण मागितलेल्या सर्व मागण्या शासन दरबारी मांडून साक्री तालुका कसा दुष्काळग्रस्त जाहीर करता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून साक्री तालुका दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले व मा.आ.सौ.मंजुळाताई गावित यांनी स्वतःच्या हाताने श्री.अनिल देसले, श्री.संजय देसले व श्री.डोंगरू बहिरम यांना ज्यूस देऊन उपोषण सोडविण्यात आले.याप्रसंगी कासारे चे गटनेते व प्राचार्य श्री.विकास देसले,श्री.विलास देसले,श्री.रावसाहेब खैरनार,श्री.मधुकर देसले,श्री.राहुल सुरेश,श्री.सुहास सोनवणे,श्री.दीपक नांद्रे,श्री.मनोहर भामरे,भाडणे गावाचे सरपंच श्री.अजय सोनवणे,नवडण्या चे उपसरपंच श्री.नितीन दादा ठाकरे,श्री.पंकज भामरे, दहिवेल येथील सरपंच श्री.प्रकाश माळी, उपसरपंच श्री.अमोल भाऊ सोनवणे, तसेच गावातील प्रगतशील शेतकरी श्री. हिम्मत नाना, श्री.छोटू आप्पा,श्री.रामदास माळी,श्री.कन्हैयालाल माळी,श्री.हेमंत बच्छाव,श्री.बापू माळी,श्री.योगेश बच्छाव,श्री.रावसाहेब खैरनार, श्री.के.टी.सूर्यवंशी,श्री.पवन संधानशिव,कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री.संजय भदाणे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध