Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

बोराडी येथील चोरी झालेली गाडी शहादा पोलिसांच्या ताब्यातून आणण्यास सांगवी पोलिसांची टाळाटाळ.



बोराडी ता.शिरपूर :- बोराडी येथील पंधरा दिवसांपूर्वी दोन मोटरसायकल दिवसा चोट्यांनी लंपास केल्या होत्या. त्यातील एक मोटारसायकल शहादा पोलीसांनी चोरास जेल बंद करून मोटरसायकल जप्त केली आहे. याबाबत शहादा पोलीस स्टेशन मधून  गाडी घेऊन जाण्यासाठी गाडी मालकाला फोन आला होता. याबाबत बोराडी बीटचे हवालदार यांना सांगितले असता त्यांनी आज जाऊ उद्या जाऊ दोन दिवसात जमेल असे सांगून सांगून आज आठ ते दहा दिवस होत आले तरीदेखील हवालदार शहादा पोलीस स्टेशन मधून गाडी आणण्यासाठी हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप मोटरसायकल मालकाने केला आहे. चोरीच्या गाड्या व चोरांना पकडण्यास सांगवी पोलीस स्टेशनला अपयश येत आहे. शहादा पोलीस स्टेशन मधून  गाडी ताब्यात घेण्यात देखील वेळ लागत असल्याकारणाने लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत धुळे पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे अशी मागणी बोराडीतील ग्रामस्थांनी केले आहे.
        
बोराडीसह परिसरात गेल्या महिन्यात चार दुचाकी वाहने दिवसाढवळ्या चोरीला गेल्या होत्या. याबाबत मोटरसायकल मालक गाडी चोरीची फिर्याद  देण्यासाठी गेल्यावर देखील टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जात होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील स्पॉट पंचनामा व तपास करण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी बोराडी बीट हवालदार यांनी घेतला तसेच त्यानंतर त्यातील एक गाडी शहादा पोलिसांनी पकडून गाडी घेऊन जाण्यासाठी गाडी मालकाला सांगितले की तुम्ही तुमच्या सांगवी पोलीस स्टेशनच्या बीट हवालदाराना घेऊन गाडी घेऊन जाण्यास सांगितले याबाबत फिर्यादीने पोलिसांना भेटून वेळोवेळी गाडी आणण्यासाठी विनंती केली पण अद्याप दहा दिवस उलटून गेले तरी देखील गाडी सांगवी पोलीसांनी ताब्यात घेतली नाही. यामुळे बोराडी बीट हवालदार आपली मनमानी कारभार करत असल्याचे बोराडीकरांनी आरोप केला आहे याबाबत वरिष्ठांनी त्वरित दखल घेऊन बोराडी बीडचे हवालदार बदलण्याची मागणी केली आहे.
        
गेल्या चार दिवसापूर्वी शहादा पोलिसांनी एक लाख 52 हजार  रुपयांच्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. तसेच दहा दिवसांपूर्वी 15 मोटरसायकल जप्त केल्या होत्या त्यातील चोरीतील प्रमुख सूत्रधार पोलिसांच्या हाती लागत नव्हता.दि.२३ ऑक्टोबर रोजी भूषण पाटील यांची होंडा शाईन कंपनीची क्र.एम.एच.18 ऐ.एम 4259 दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली होती.व चोरटा हा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे दिसत होते.याबाबत वृत्तपत्रांनी चोर त्याचा फोटोसह बातमी प्रसिद्ध केली होती या सीसीटीव्ही आधारे शहादा पोलिसांनी दूधखेडा येथील गणेश पवार याला डोंगरगाव रस्त्यावरून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील चोरीच्या पाच मोटरसायकली जप्त करण्यात आल्या त्यातील एक मोटरसायकल ही बोराडी येथील भूषण धुडकु पाटील यांची होती. यावरून शहादा पोलिसांचा गाडी मालकाला फोन आला होता आपली गाडी ओळखण्यास शहादा पोलीस स्टेशनला बोलावले होते व गाडीची खात्री करून आपण आपल्या बीडचे तपास हवालदार यांना घेऊन गाडी घेऊन जाण्यास सांगितले होते. 

याबाबत भूषण पाटील यांनी वारंवार बोराडी बीट हवालदार यांना सांगून देखील अद्याप शहादा पोलिसांच्या ताब्यातील गाडी सांगवी पोलिसांच्या ताब्यात घेण्यास आली नाही. यावरून बोराडी गावातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.तसेच या अगोदर  धैर्यशील चव्हाण यांचे देखील गाडी घराजवळून चोरांनी लंपास केली होती ती गाडी देखील पोलिसांनी हस्तगत करून गाडी मालकाला परत करण्यासाठी पोलिसांनी तब्बल अडीच महिन्याचा कालावधी घेतला होता.
        
सांगवी पोलीस स्टेशनला चोरीस गेलेला मुद्देमाल व चोर देखील सापडत नाही. पण जवळील पोलिसांना मुद्देमाल सह चोर सापडतात यावरून सांगवी पोलीस स्टेशनच्या कामावर  प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तसेच  चोरीची फिर्याद देण्यासाठी गेल्यावर तासोतास पोलीस स्टेशन मध्ये बसून राहावे लागते काही वेळा फिरावे लागते म्हणून टाळाटाळ केली जाते. याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कारण की चोरीची फिर्याद दाखल न झाल्यास त्या गाड्या इतर ठिकाणी सापडतात जर चोरीची नोंद झालेली नसेल तर ईतर पोलिस स्टेशन मधील  सापडलेल्या गाड्या देखील गाडी मालकांना मिळणार नाही. चोरीची फिर्याद घेणे हे गरजेचे असताना देखील सांगली पोलीस स्टेशन चे अधिकारी  फिर्याद घेण्यास का टाळाटाळ करतात याबाबत देखील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच बोराडी येथील अनेक मोटरसायकल व घोरफोटी झालेल्या आहेत यातील चोरटे अजून देखील जेल बंद झालेले नाही याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून सांगवी पोलीस स्टेशनचा कारभारावर लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाल्या असल्याचे नागरिकांचे मत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध