Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०२३

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एका नामांकित बँकेतील गैरव्यवहार व अपहराचे घोटाळे एका मागून एक उजेडात येण्याच्या मार्गावर ही नेमकी शेतकऱ्यांची बँक ही घोटाळ्यांची बँक हेच जनतेला कळेना....?



धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एका नामांकित शेतकऱ्यांच्या बँकेतील व विशेष करून शिरपूर तालुक्यातच एका मागून एक घोटाळे समोर येण्याच्या मार्गावर आहे. 
यातच  शेतकऱ्यांच्या नामांकित बँकेत शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांची व्याज रूपाने होणारी फसवणूक, मध्यम मुदत कर्जाच्या योजनांमध्ये अनुदान रूपाची फसवणूक, वैयक्तिक कर्जत होणारी फसवणूक, सभासदांचा आलेला भरणा स्व:हितार्थ वापरून आपल्या मर्जीनुसार 31 मार्चला भरणा करणे. संस्थेला सचिव नसताना संस्थेचे कोणतेही दप्तर ठिकाणावर नसताना कर्जाच्या वाटपाची ठराव  नसताना कर्जाच्या अटी शर्तीस मंजुरी नसताना मंजूर नसताना बेकायदेशीर व नियम काय पण कर्ज वितरण करणे असे कितीतरी प्रकार उघड होण्याच्या मार्गावर आहेत. यात शेतकऱ्यांबरोबर खुद्द बँकेची देखील फसवणूक या बँकेच्या कर्मचाऱ्याकडून होत असल्याचे दिसून येत आहे. 

मात्र बँकेची प्रशासन व्यवस्थेस  याबाबतची पूर्ण कल्पना व संपूर्ण माहिती असताना देखील दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. म्हणजेच हेतू पुरस्कार व जाणून बुजून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार या बँकेची परंपरा आहे, असे बऱ्याचशा प्रकरणात दिसून आले आहे. व ही परंपराची श्रॄंखला पूर्णता उघड करणे हे आमच्या जनसेवेचे कर्तव्य आहे. 

( वाचा सविस्तर पुढील अंकात...)





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध