Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
जेष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे "बेस्ट एडोटोरियल 2023 "पुरस्काराने पोलिस दला तर्फे सन्मानित पत्रकार आणि पोलीस हे एका नाण्याच्या दोन बाजू - डी एस पी श्रीकांत धिवरे...
जेष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे "बेस्ट एडोटोरियल 2023 "पुरस्काराने पोलिस दला तर्फे सन्मानित पत्रकार आणि पोलीस हे एका नाण्याच्या दोन बाजू - डी एस पी श्रीकांत धिवरे...
धुळे प्रतिनिधी :-पत्रकार आणि पोलीस यांचे एकमेकाशी असलेले संबंध आणि पोलीसां प्रमाणेच पत्रकारांवर असलेली जबाबदारी लक्षात घेता.आणि त्यांना द्यावे लागणारे योगदान लक्षात घेता पत्रकारांचा सन्मान करण्याची संकल्पना सुचली,व ती प्रत्यक्षात अंमलांत आणल्याचा मला आनंद होत असल्याचे,प्रतिपादन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी,पत्रकारांच्या सन्मान समारंभात बोलतांना केले.
विविध विषयात नाविण्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील पत्रकारांना,पोलीस विभागा मार्फत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हाटेल ऋतुराज मध्ये सर्वश्री पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप अधिक्षक ऋषिकेष रेड्डी,उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे आदीं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत,
आयोजित या समारंभाचा शुभारंभ,जेष्ठ पत्रकार महेशबाबां घुगे यांच्या हस्ते ,बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला.सुरवातीला श्रीकांत धिवरे यांनी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात मागची पार्श्वभूमी विषद केली.अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकारांची निवड,निवड समितीने कशी केली हे विषद केले.
आझादनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पहाडी आवाजात महाराष्ट्र गीत गाऊन,वातावरण प्रफुल्लित केले.
या वेळी सर्वश्री योगेंद्र जुनागडे,हेमंत मदाने,निखील सुर्यवंशी,मनोज गर्दे,
यशवंत हरणे, राजेंद्र सोनार,महेश मासोळे,संतोष मासोळे,प्रशांत परदेशी,
विजय डोंगरे,धनंजय दिक्षित,गणेश सूर्यवंशी,राम निकुंभ,देवेंद्र पाठक,यांना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे हस्ते,सन्मान चिन्ह,प्रशस्ती पत्र व पुष्प गुच्छ,देऊन गौरविण्यात आले.
ऊतरादाखल ,पुरस्कार प्राप्त सन्मानार्थीनी , आपले अनुभव सांगितले.योगेंद्र जुनागडे यांचा पुरस्कार स्वीकारणारे त्यांचे चिरंजीव निखील जुनागडे यांनी या पुरस्काराचे श्रेय आपल्या आजीने केलेल्या प्रामाणिकपणाच्या संस्काराला दिले.
शेवटी एलसीबी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानलेत.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदिश देवपूरकर यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा