Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४
साक्री तालुक्यातील असंख्य तरुणांचा प्रहार जनशक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश
आज रोजी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या प्रहार मध्ये साक्री तालुक्यातील शासकिय विश्रामगृह येथे तरुण व महिलांचा मोठ्या संख्येने प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश करण्यात आला
प्रहार तालुका विभाग प्रमुख,जयेश बावा व दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्या मार्गद्शनाखाली पक्ष प्रवेश सोहळा पार पडला तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उमेश पाटिल सर,साक्री तालुका उपाध्यक्ष नाना शेलार,शशीकांत अहिरराव,प्रदीप सोनवणे,युवराज मराठे,गोकुळ बेडसे,राजु भदाणे होते तसेच पक्ष प्रवेश करणाऱ्या तरुणांमध्ये महेश नांद्रे,राहुल नांद्रे,पवन राजपूत, उमेश पाटील,रवी सुळ,अतुल साळुंखे,किरण सुळ, कैलास कोळेकर,संदीप वाघमोडे,अहमद खान पठाण,कैलास गोयकर,उत्तम गोयकर तसेच महिलांमध्ये भुराबाई भदाणे, सुनंदा शेलार,अनिता अहिरे, सुक्रीबाई अहिरे,उज्वला चित्ते,गजाबाई वाघमोडे त्याच बरोबर अनेक महिलांनी प्रवेश केला असून आनंद व्यक्त केला.
यावेळेस जयेश बावा यांनी प्रहार जनशक्ती पक्ष हा सेवा करणारा पक्ष जास्तीत जास्त तरुणांनी प्रहार मध्ये येऊन सेवा करण्याची संधी स्वीकारावी असे आव्हान केले,महेश नांद्रे यांनी संघटनेचे महत्व पटून दिले उमेश पाटील सरांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहित केले तसेच नाना शेलार यांनी आभार व्यक्त केले यावेळी उपस्थीत सागर बावा,भीला कोळेकर,राजू कोरडकर, हरिभाऊ बोरसे, सोमनाथ विसपुते,पांडुरंग सोनवणे,मुनीलाल चौरे,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा