Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४
राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन
शिरपूर प्रतिनिधी :- दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिंगावे गावात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळेस सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिंगावे गावचे लोकनियुक्त सरपंच शिरीष पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे हे उपस्थित होते. शिवजयंती निमित्ताने गावातील युवा व युतीने मोठ्या संख्येने शिबिरात हजेरी लावत रक्तदान केले.
यावेळी शिंगावे गावातील लोकांनी आयोजकांचे खूप भरभरून कौतुक केले या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष राकेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत निकवाडे, यांनी मेहनत घेतली त्याचबरोबर गावातील रुपाली विवेक सुर्यवंशी, संजीवनी रामू पाटील, विक्की मोरे, मयूर कोळी, संघमित्रा महेंद्र नगराळे, देविदास आहिरे, अरमान पिंजारी, प्रवीण पाटील, कन्हैया आहीरे, आनंद मोरे, सोनु माळी, सनी भिल, सागर कोळी, सागर सोनार, ओंकेश पाटील, विवेक सूर्यवंशी, सागर शिंपी, विशाल मराठे, तसेच अनमोल सहकार्य म्हणून स्व. श्री मुकेश भाई पटेल ब्लड सेंटर ॲण्ड ब्लड कंपोनन्ट यांनी सहकार्य केले तसेच राकेश पाटील यांनी देखील त्यांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा