Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
शिरपूर परिट (धोबी) सेवा मंडळ तालुकाध्यक्षपदी भास्कर बोरसे, शहराध्यक्षपदी नरेश पवार
शिरपूर परिट (धोबी) सेवा मंडळ तालुकाध्यक्षपदी भास्कर बोरसे, शहराध्यक्षपदी नरेश पवार
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर शहर व तालुक्यातील परिट (धोबी) सेवा मंडळाची बैठक अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांचा अध्यक्षतेखाली तर महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरूण धोबी, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ तंटामुक्ती समिती प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सदाशिव ठाकरे, प्रसिध्द उद्योजक अशोक बेडिस्कर, माजी शहराध्यक्ष भगवान वाघ यांचा प्रमुख उपस्थित भाजपा कार्यालय, गांधी मार्केट, शिरपुर जि. धुळे येथे नुकतीच घेण्यात आली. यावेळी शिरपूर परिट (धोबी) सेवा मंडळ तालुकाध्यक्षपदी भास्कर गोपाल बोरसे (सांगवी) तर शहराध्यक्षपदी नरेश शांताराम पवार (शिरपूर) यांची सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. तसेच शहर कार्यकारणी जाहिर करण्यात आली शहर उपाध्यक्षपदी मयुर संजय येशी, निखील शशीकांत सुर्यवंशी, सरचिटणीसपदी जितेंद्र लक्ष्मण बोरसे (गोलु), खजिनदारपदी महेंद्र साहेबराव येशी (छोटु), चिटणीसपदी विनोद ईश्वर येशी, संभाजी माधवराव बोरसे, संजय सोनवणे, सदस्यपदी हरिओम गणेश भिलाणे, हिरामण तुकाराम शिंदे, शालीग्राम रामचंद्र येशी, दिलीप विनायक येशी, भुषण रमाकांत भिलाणे, प्रविण रघुनाथ बोरसे, चेतन राजेंद्र येशी यांची निवड करण्यात आली असुन प्रमुख सल्लागार म्हणुन अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरूण धोबी, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ तंटामुक्ती समिती प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सदाशिव ठाकरे, प्रसिध्द उद्योजक अशोक बेडिस्कर तर सल्लागार सदस्यपदी माजी शहराध्यक्ष भगवान वाघ, सुनिल सुर्यवंशी, गंगाराम बोरसे, राजेंद्र येशी, नामदेव बोरसे हे आहेत. शिवाय लवकरच तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात येणार आहे.
शिरपूर परिट (धोबी) सेवा मंडळ तालुकाध्यक्षपदी भास्कर बोरसे, शहराध्यक्षपदी नरेश पवार यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी समाज बांधव बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा