Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४
जैन समाज भवन बांधकामासाठी खा.डॉ. हीना गावित यांच्याकडून एक कोटींचा निधी...!
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर येथील जैन गल्लीतील जैन समाज भवन बांधकामासाठी नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्याकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी डॉ तुषार रंधे, राहुल रंधे व ऍड.अमित जैन यांनी पाठपुरावा केला होता.
खा.डॉ.गावित यांच्या निधीतून वरचे गाव जैन गल्ली येथील जैन विशा श्रीमाळी श्र्वेतांबर मूर्तिपूजक जैन समाज भवनाचे 70 लाख रुपये खर्च असलेले बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासोबतच जुनी देना बँक चौकात श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ समाज भवनाचे 30 लाख रुपये खर्चाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
खा.डॉ.गावित यांचा 27 ला सत्कार
जैन समाज भवनासाठी भरीव निधी मंजूर करून दिल्याबद्दल खा.डॉ. हीना गावित व डॉ तुषार रंधे यांचा जैन समाजातर्फे 27 फेब्रुवारीला सायंकाळी सातला जैन गल्ली येथील जैन वाडीत जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा