Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील बाळदे – जातोडे परिसरातील अवैध वाळू वाहतूकीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष का ? परिसरातील नागरिकांना पळलेला प्रश्न..!
शिरपूर तालुक्यातील बाळदे – जातोडे परिसरातील अवैध वाळू वाहतूकीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष का ? परिसरातील नागरिकांना पळलेला प्रश्न..!
शिरपूर प्रतिनिधी:- जातोडे बाळदे परिसरात अवैध वाळू वाहतूकीने अक्षरशः हैदोस घातला असून यामुळे शिरपूर बाळदे रस्त्याने वाहतूक करणाऱ्यांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.अवैध वाळू वाहतूकीकडे महसूल विभाग कानाडोळा डोळा करत असून पुन्हा अवैध वाळू वाहतूकीमुळे या परिसरात जिव जाण्याची वाट बघत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिरपूर तालुक्यातील जातोडे परिसरात अवैध वाळू वाहतूकीमुळे मोठा अपघात घडला होता यात महिलेला आपला जिव गमवावा लागला होता.यानंतर या परिसरात अवैध वाळू वाहतूक बंद झाली होती.मात्र पुन्हा या परिसरात भरदिवसा अवैध वाळू वाहतूकीने हैदोस घातला आहे.अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे भरधाव ट्रॅक्टरांमुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय तर दुसरीकडे या वाळू वाहतूकीमुळे रस्त्यावर वाळू पडल्याने नाहक अपघातांना निमंत्रण दिले जात आहे.
रात्रंदिवस या परिसरातून अवैव वाहतूक होत असतांना मात्र महसूल विभाग झोपेच सोंग करतांना दिसत आहे. महसूल विभाला येथील वाळू वाहतूक का दिसत नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.याबाबत तक्रार केली तर फक्त तात्पुरती परिसरात महसूल विभागाकडून वाहनात बसून फेरी मारून पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते.या अवैध वाळु वाहतूकीला नेमका कोणाचा आशिर्वाद आहे ? असा प्रश्न परिसरात उपस्थित होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा