Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ एप्रिल, २०२४

के.सी.पाडवी म्हणजे शुद्ध नौटंकी ; डॉ.हीना गावित यांचा घणाघात



आमदार के.सी.पाडवी यांचा कामापेक्षा दिखाऊपणा अधिक असतो. दर पाच वर्षांनी नवी नौटंकी करून ते आदिवासींची दिशाभूल करतात. पण आता मतदार सुज्ञ झाला आहे. तो नौटंकीला भुलणार नाही असा घणाघात नंदुरबार लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या उमेदवार डॉ.हीना गावित यांनी केला.

शिरपूर मतदार संघात प्रचार करतांना कोपरा सभांमधून त्यांनी आ.पाडवी यांच्यावर टीका केली. 

त्या म्हणाल्या की, आ.पाडवी यांच्याकडे एक फाटलेला शर्ट आहे. तो व्यवस्थित धुवून, इस्त्री करून कपाटात ठेवलेला असतो. निवडणूक आली रे आली की, पाडवी तो शर्ट कपाटातून बाहेर काढून अंगात घालतात. मते मागताना तो शर्ट दाखवून मी गरीब उमेदवार आहे, मला मते द्या अशी विनंती करतात. निवडणूक संपली की पुन्हा तो शर्ट धुवून इस्त्री करून पुन्हा कपाटात जातो. तो पुढच्या निवडणुकीतच बाहेर काढला जातो. ही नौटंकी ते कित्येक वर्षांपासून करीत आहेत. आता मात्र ती चालणार नाही, जनता त्यांना मतदानातून धडा शिकवेल असे डॉ.गावित म्हणाल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध