Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० एप्रिल, २०२४
रखरखत्या उन्हात डॉ हिना गाविताचा प्रचार,ठिकठिकाणी जंगी स्वागत...
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधीकृत उमेदवार डॉ हिना गावित यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आपल्या विरोधी उमेदवार महाविकास आघाडीच्या ऑड गोवाल यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या प्रचारात अत्यंत सुसूत्रता दिसून येत आहे. रोज गावभेटी देणे, नागरिकामध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचे काम डॉ हिना गावित करत आहेत. काल त्या नवापूर दौऱ्यावर असून नवापूर शहरातील नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून उष्णतेचा पारा ४० -४२ अंशापर्यंत पोहोचला आहे. मात्र रखरखत्या उन्हातही डॉ हिना गावित यांना पाठींबा देण्यासाठी नवापूर व परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. ढोल-ताशांच्या गजरात डॉ गावित यांचे नवापूर व परिसरात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी नवापूर रहिवासी मोठ्या संख्येने जमले होते. डॉ हिना गावित यांना आपला पाठिंबा असल्याचा विश्वास मतदारांनी यावेळी व्यक्त केला. या दौऱ्यामध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा