Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ मे, २०२४
Home
/
Unlabelled
/
बोराडी वासीयांच्या प्रामाणिकपणा अपघात समयी सापडलेले 44500 रुपये केले परत. पैशांचा कुठलाही मोह न ठेवता अपघातादरम्यान रस्त्यावर पडलेले पैसे परत करीत घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन.
बोराडी वासीयांच्या प्रामाणिकपणा अपघात समयी सापडलेले 44500 रुपये केले परत. पैशांचा कुठलाही मोह न ठेवता अपघातादरम्यान रस्त्यावर पडलेले पैसे परत करीत घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन.
बोराळी प्रतिनिधी :- आजच्या जगातही समाजात प्रामाणिकपणा,माणुसकी टिकून आहे याची प्रचिती देणारे उदाहरण नुकतेच बोराडी येथे पहायला मिळाले आहे.महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेले पळासनेर जवळील मोहिदा येथील रहिवासी सुनिल पावरा हा तरुण आपली नवीन दुचाकी खरेदी करून वाघाडी येथे एका शेतात सालदार असलेल्या आपल्या माता पित्यांना दाखवण्यासाठी बोराडी मार्गे जात असतांना, बोराडी घाटी क्षेत्रात त्याची दुचाकी एका दगडावरुन सरकल्याने त्याचा अपघात झाला व सदर घटने दरम्यान त्या सुनील पावरा यांचे 44500 रुपये हे अनावधानाने खिशातून पडले.त्याप्रसंगी आपल्या कामानिमित्त शिरपूर येथे जाऊन परतत असतांना बोराडी येथील रहिवासी सतीश पवार हे व त्यांचे सहकारी मित्र अनिल सोनवणे,परेश बडगुजर,राजू तिरमले,आबा तिरमले,शशी सत्यविजय,यांनी अपघात ठिकाणी थांबत सुनील पावरा यांना उचलून दवाखान्यात दाखल केले.व प्रथमोपचार केला.उपचारादरम्यान सुनील पावरा यांच्या खिशातून पैसे पडल्याची जाणीव त्यांना झाली असता त्यांच्या चेहऱ्यावर एकदम दुःख दिसून आले.व पै पै जमा करून जमविले पैसे हरविल्याने त्यांच्या डोळ्यातुन अश्रू ओघोळत होते.सतीश पवार यांनी सुनील पावरा यांना काय झाले ? अशी विचारणा केली असता सुनील पावरा यांनी त्यांचे पैसे हरविले असल्याचे सांगितले.सतीश पवार यांनी नोटा कशा होत्या चौकशी अशी चौकशी केली.सुनील पावरा याने सांगितले पाचशे रुपयाच्या रुपयांच्या नोटा होत्या.नंतर पवार यांनी सुनिलला सावरत आम्हाला पैसे सापडले आहे असे सांगितले.व लागलीच सुनीलचा नाराज चेहरा एकदम फुलून गेला लगेच पवार यांनी अनिल सोनवणे,परेश बडगुजर,राजू तिरमले,आबा तिरमले,
शशी सत्यविजय यांच्या साक्षीने सुनीलला पैसे परत दिले असता सुनील पावरा याला आनंद अश्रू अनावर झाले व त्यांने सर्वांचे आभार व्यक्त केले तसेच बोराडी वासीयांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा