Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २२ मे, २०२४

श्रीपतराव भोसले महाविद्यालयाचा प्रथमेश जिल्ह्यात प्रथम...


धाराशिव (राहूल शिंदे) दि. २२ शहरातील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एच. एस.सी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. यामध्ये विज्ञान शाखेतून प्रथमेश सिताराम दिरगुळे ९२.५० टक्के गुणांसह जिल्ह्यात प्रथम आला आहे. तर,
स्नेहल विजय पवार ९१ टक्के गुणांसह द्वितीय असून ऋतुजा जयवंतत साळुंके ९० टक्के गुणांसह तृतीय आहे. विज्ञान शाखेतील या विद्यार्थ्यांचं यश नक्कीच उज्जवल भविष्याची नांदी आहे.

महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा ९९ टक्के निकाल लागला असून ११८
विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये, २० विद्यार्थ्यांना ७५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यामध्ये, रामदास लक्ष्मण तांबे हा ९२ टक्के गुणांसह प्रथम आला असून वैष्णवी महादेव रोटे ८९.१७ टक्के गुणांसह द्वितीय आहे, विशेष म्हणजे रोहित ईश्वर लांडे हाही ८९.१७ गुणांसह द्वितीय आला आहे. तर, किर्ती प्रकाश मोरे ८८.६७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

कला शाखेतून १९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये आहेर कोमल बाळासाहेब ९२टक्के गुण घेवून प्रथम आली आहे.शिंदे निकिता बाळासाहेब ८९टक्के गुण घेवून द्वितीय आली आहे तर तांबारे अमृता किरण ८८ टक्के गुण घेवून तृतीय आली आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संस्था अध्यक्ष सुधीर पाटील,प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, साहेबराव देशमुख यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवले आहे. सर्वांचे अभिनंदन.
बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. त्यामध्ये आपल्या श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिवमधील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवले आहे. आपल्या संस्थेची व विद्यालयाची किर्ती जपण्याचं व ती वाढवणयाचं काम या विद्यार्थ्यांनी करुन ग्रामीण भागातील मुलेही कुठे कमी नसल्याचं दाखवून दिलं.आपल्या महाविद्यालयातील या गुणवंत विद्यार्थ्यांचे यश महाविद्यालयाची गुणवत्ता आणि दर्जात्मक शिक्षणपद्धतीचं उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनो तुम्ही भविष्यातही असेच यश मिळवत राहावे, अशी माझी अपेक्षा आहे. त्याचबरोबर पालकवर्गांचे देखील विशेष आभार तुमच्या पाठींब्याने आणि मुलांना दिलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे त्यांनी आज हे शिखर गाठले आहे. महाविद्यालयीतल सर्वच गुणवंत आणि पास झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा..
सुधीर पाटील, संस्था अध्यक्ष श्रीपतराव भोसले महाविद्यालय.
नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्याने केलेली मेहनत हेच यशाचे गमक... 
मी आज अत्यंत आनंद आणि गर्वाने सांगू इच्छितो की मी बारावीच्या परीक्षेत आमच्या कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून प्रथम आलो आहे. हे यश मिळवण्यासाठी मला अनेकांची मदत आणि प्रोत्साहन मिळाले. माझे शिक्षक, पालक, आणि मित्र यांच्याशिवाय हे शक्य झाले नसते. या यशामागील एक मुख्य कारण म्हणजे नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्याने केलेली मेहनत. मी दररोज ठराविक वेळ दिला आणि अभ्यासाचे विषय वेळापत्रकानुसार विभागून घेतले. अवघड विषयांवर जास्त लक्ष केंद्रित केले आणि नियमित पुनरावलोकन केले.          रामदास लक्ष्मण तांबे, वाणिज्य शाखेतून प्रथम.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध