Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १६ मे, २०२४

धुळे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी एचडीबीटी बोगस कापूस बियाण्याचे 650 पाकिटे पकडून संबंधित दुकानदारावर शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला



मा.मोहन वाघ सर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली
आज दि.१५.०५.२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त  खबरीनुसार मे.संतकृपा कृषी सेवा केंद्र लोहगाव ता. शिंदखेडा जि.धुळे चे प्रोप्रायटर ईश्वर चिंतामण माळी रा.लोहगाव यांचे मालकीचे शेतकरी बंधूंना विक्री हेतु प्रतिबंधित संशयित एचटीबीटी बोगस कापुस बियाणे असल्याबाबत गुप्त खबर जिल्हा भरारी पथकाला मिळाली होती.
त्यानुसार आज सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास 
श्री.अरुण तायडे,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक,धुळे,श्री.अभय कोर,कृषी अधिकारी,पंचायत समिती,शिंदखेडा,श्री.रमेश नेतनराव,कृषी अधिकारी, पंचायत समिती,साक्री आणि पोलिस नाईक श्री.चेतन कंखरे यांच्या पथकाने पाळत ठेवून लोहगाव येथे छापा टाकून एका घरातून रक्कम रुपये ८ लाख १० हजार किंमतीचे ६५० प्रतिबंधित संशयित एचटीबीटी बोगस  कापुस बियाणे जप्त करुन पोलीस ठाणे, शिंदखेडा जि.धुळे येथे गु.र.नं १५९/२०२४ अन्वये कृषी अधिकारी श्री.अभय कोर यांनी
मे.संतकृपा कृषी सेवा केंद्र ,लोहगाव ता. शिंदखेडा जिल्हा धुळे चे प्रोप्रायटर संशयित ईश्वर चिंतामण माळी , सदर बियाण्याची उत्पादन व विपणन कंपनी,मालक संचालक 
 तसेच जबाबदार व्यक्ति यांचे विरोधात बियाणे कायदा १९६६, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ व जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 
या कारवाईसाठी 
श्री.कैलास शिरसाठ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी धुळे, 
सौ.कावेरी राजपूत,कृषी विकास अधिकारी (जि.प)धुळे,श्री.बापु गावित,उपविभागीय कृषी अधिकारी धुळे,श्री.नितेंद्र पानपाटील, विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक,नाशिक विभाग नाशिक,श्री.प्रदिप निकम,मोहीम अधिकारी,धुळे,
श्री.शितलकुमार तवर तालुका कृषी अधिकारी, शिंदखेडा, यांनी हा सापळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री.मिलिंद पवार पुढील तपास करीत आहेत.
प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात गय केली जाणार नाही असा कडक इशारा मा.मोहन वाघ सर , विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध