Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ मे, २०२४

आ.अमरिशभाई पटेल, सदस्य, विधान परिषद शिरपूर तालुक्यातील मतदार बंधू भगिनींना या निवेदनाद्वारे नम्र आवाहन करतो की,



नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुती तर्फे डॉ.हिनाताई विजयकुमार गावित उमेदवारी करीत आहेत. 

भाजप सरकारच्या काळात शिरपूर तालुक्याला अभूतपूर्व विकास निधी मिळाला आहे. त्याच्या माध्यमातून शिक्षण, सिंचन, रोजगार आणि आरोग्याच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणे शक्य झाले आहे. आदिवासी बांधवांना हक्काचे वनपट्टे आणि वन सातबारे देऊन कृषी विषयक योजनांचा लाभ भाजप सरकारच्या सहकार्यामुळे मिळू शकला आहे.

डॉ. हिनाताई गावित यांच्या प्रचारासाठी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा आठ मे रोजी बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी व माननीय देवेंद्रजींचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे व शिरपूर तालुक्याच्या एकजुटीचे प्रदर्शन करावे ही नम्र विनंती !

बंधुंनो आणि भगिनींनो,
 
ही निवडणूक आपण देशाचे पंतप्रधान विकास पुरुष माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी लढवीत आहोत. आपला देश जगात सर्वोच्च स्थानी न्यायचा असेल, गोरगरिबाला त्यांच्या गरजा पूर्ण करावयाच्या असतील, प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळवायचा असेल आणि आपले कुटुंब सुखासमाधानाने आणि समृद्धीमध्ये जगावे असे आपल्याला वाटत असेल तर लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष शिवाय पर्याय नाही. आपण सर्व सुजाण आहात. नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहत आला आहात. मी देखील आपल्या उपकारांची परतफेड करण्यासाठी अहोरात्र काम करून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आपले आणि माझे नाते अगदी हक्काचे असून त्या हक्काद्वारेच आपल्याला आवाहन करतो की, येत्या 13 मे रोजी होणाऱ्या मतदान प्रसंगी आपण मतदान यंत्रावरील डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांच्या नावासमोर असलेल्या कमळ चिन्हाचे बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करावे. धन्यवाद !!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध