Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ मे, २०२४
Home
/
Unlabelled
/
माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल यांच्या पाठपुराव्याने, शिरपूर साखर कारखाना अक्षय तृतियाच्या शुभ महूर्तावर 10 मे रोजी माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. (म.प्र.) यांना भाडेतत्वावर ताब्यात देण्याची प्रक्रिया
माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल यांच्या पाठपुराव्याने, शिरपूर साखर कारखाना अक्षय तृतियाच्या शुभ महूर्तावर 10 मे रोजी माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. (म.प्र.) यांना भाडेतत्वावर ताब्यात देण्याची प्रक्रिया
शिरपूर प्रतिनिधी : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या पाठपुराव्याने शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्या. लि. शिवाजीनगर, दहिवद ता. शिरपूर जि. धुळे हा भाडेतत्वावर देण्यासाठी संचालक मंडळामध्ये चर्चा होऊन, कारखाना भाडेतत्वावर देण्याचे निश्चित करण्यात आले.त्या नुसार दि. 10/09/2022 रोजी सर्व कारखाना सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती व त्या नुसार सर्व सदस्यांनी बहुमताने भाडेतत्वावर कारखाना देण्यासाठी संमती दिली होती.नतर निविदा तयार करणे, जाहिरात प्रसिद्ध करणे व प्रत्यक्ष कामकाज सुरु झाले. ई-ऑक्शन (ई-निवीदा) द्वारे ऑनलाईन निवीदा प्रसिद्ध करण्यात आली.ऑनलाईन ई-ऑक्शन (ई-निविदा) प्रक्रियेनुसार माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. बैतूल मध्यप्रदेश यांची निविदा सर्वोच्च दराची असल्याने त्यांना 20 वर्षासाठी सदरचा कारखाना भाडेतत्वाने देण्याचे निश्चित करण्यात आले.
या संदर्भात शिरपूर साखर कारखाना व धुळे जिल्हा बँक यांच्या संयुक्त समितीने सदरची संपूर्ण प्रक्रिया पार पाडली असून, साखर कारखाना संचालक मंडळ व जिल्हा बँक संचालक मंडळ यांनी याबाबतचा ठराव मंजूर केला आहे.
दि.10/09/2022 पासून सर्व निविदा कायदेशीर प्रक्रिया, मा. न्यायालयीन बाबींची पूर्तता, साखर कारखाना व जिल्हा बँक यांचे देणी रकमेबाबतचा सर्व वरीष्ठ कार्यालय स्तरावरचा पत्रव्यवहार व साखर कारखाना यांची देणे रकमेबाबतचे इतर मा. न्यायालयातील न्यायप्रविष्ट बाबी, शासकीय देणे बाबत कागदपत्रांची तपासणी व कारखाना 20 वर्षासाठी भाडेतत्वाने देण्यासाठीचा भाडे करारनामा यासाठीची सर्व कायदेशीर प्रक्रिया, तज्ञ वकिलांचे मार्गदर्शन व पूर्ततेसाठी मधल्या काळात कामकाज झाले.वरील सर्व प्रक्रिया पूर्ण करून अक्षय तृतियाच्या शुभ महूर्तावर दि. 10/05/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता सदरचा कारखाना पुढील वर्षाचा म्हणजेच सन 2024-25 च्या ऊस गळीत हंगामासाठी 20 वर्ष कालावधी साठी भाडेतत्वावर देण्यासाठी मे. माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. मध्यप्रदेश यांना ताब्यात देण्याचा निर्णय शिरपूर सहकारी साखर कारखाना यांचे संचालक मंडळाने एकमताने घेतला आहे.
त्यानुसार दि.10/05/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता कारखाना ताब्यात देण्याची प्रक्रिया कारखाना संचालक मंडळ व जिल्हा बँक यांच्या वतीने पूर्ण करण्यात येणार आहे असे जिल्हा बँक अध्यक्ष माजी आ. राजवर्धन कदमबांडे, साखर कारखाना अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीपभाई पटेल यांनी कळविले आहे.
सदर उद्योजक अंकित अग्रवाल यांनी हा 8 वा साखर कारखाना चालवायला घेतला असून यापूर्वी 7 साखर कारखाने त्यांनी यशस्वीरित्या चालविले आहेत. यापूर्वीच्या कारखान्यातून इथेनॉल निर्मिती व विज निर्मितीवर त्यांनी फार मोठ्या प्रमाणात भर देऊन भरपूर इथेनॉल व विज निर्मिती केली आहे.
गेल्या काही वर्षापासुन शिरपूर तालुक्यातील ऊस अनुभवी उद्योजक अंकित अग्रवाल यांच्याच दुर्गा खांडसरी व ठिकरी मध्यप्रदेश येथील साखर कारखान्यांमध्ये शेतकरी बांधव नेत होते. त्यामुळे संबंधित उद्योजक हे शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांचे सुपरिचित असून त्यांचा आर्थिक व्यवहार चांगला असल्याचा अनुभव शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घेतला आहे.
त्यामुळे अतिशय योग्य व चांगल्या ग्रुपला शिरपूर साखर कारखाना अक्षय तृतियेच्या शुभमुहुर्तावर हस्तांतरित होत असल्याची बाब समाधानकारक व आनंददायी असल्याच्या प्रतिक्रिया शिरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व नागरिकांनी दिल्या आहेत.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : चारचाकीने रिक्षाला धडक दिल्यावरून रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना २० रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंगरूळ ये...
-
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई अमळनेर : दलित वस्ती सुधारणा रस्त्याच्या कामाच्या बिलाच्या मोबदल्यात १० टक्के कमिशन मागणाऱ्या पा...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आय...
-
शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा