Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ मे, २०२४
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्हा कृषी विभाग अलर्ट मोडवर ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कारवाईचा बडगा
धुळे जिल्हा कृषी विभाग अलर्ट मोडवर ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कारवाईचा बडगा
माननीय विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग ,नाशिक आदरणीय श्री मोहन वाघ साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच धुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धुळे श्री कैलास शिरसाट साहेब व कृषी विकास अधिकारी,जिल्हा परिषद धुळे श्रीमती कावेरी राजपूत यांच्या मार्गदर्शनाने व सहभागाने
आज दिनांक 26/5/ 2024 रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार मेसर्स चित्राई कृषी सेवा केंद्र ,लक्ष्मी रोड ,साक्रीचे प्रोप्रायटर श्री. निलेश दिगंबर सावळे या बियाणे विक्री केंद्रातून मेसर्स राशी सीड्स कोईबतूर उत्पादित आर सी एच 578 बीजी 2 या कापूस बियाण्याची जादा दराने विक्री होत असल्याबाबत गुप्त खबर जिल्हा भरारी पथकाला मिळाली होती.त्यानुसार आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद,धुळे,श्रीमती कावेरी राजपूत ,मोहीम अधिकारी श्री प्रदीपकुमार निकम
कृषी अधिकारी पंचायत समिती,साक्री,श्री रमेश महादेव नेतनराव
तालुका कृषी अधिकारी साक्री श्री योगेश सोनवणे ,
मंडळ कृषी अधिकारी पिंपळनेर श्री तानाजी सदगीर,
डाटा ऑपरेटर रिजवान शेख ,पोलीस कॉन्स्टेबल श्री पांचाळ यांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून सदर बियाणे विक्री केंद्रावर छापा टाकून मेसर्स राशी सीड्स उत्पादित संकरित कापूस बियाणे वाण आर सी एच 578 बीजी 2 ची प्रति पाकीट 1100 रुपये याप्रमाणे जादा दराने विक्री होत असल्याचे रंगेहात पकडले.
त्यामुळे मोहीम अधिकारी जिल्हा परिषद, धुळे ,श्री प्रदीपकुमार निकम यांनी मेसर्स चित्राई कृषी सेवा केंद्र साक्रीचे प्रोप्रायटर श्री निलेश दिगंबर सावळे यांच्या विरोधात बियाणे कायदा 1966,बियाणे नियंत्रण आदेश 1983,इत्यादी अन्वये साक्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 194 /2024 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईसाठी श्री रमेश महादेव नेतनराव कृषी अधिकारी,पंचायत समिती,साक्री
श्री योगेश दिगंबर सोनवणे,तालुका कृषी अधिकारी,साक्री श्री.रिजवान रफिक शेख डाटा ऑपरेटर साक्री,श्री तानाजी सदगीर मंडळ कृषी अधिकारी ,पिंपळनेर यांनी परिश्रम घेतले. तसेच या कारवाईसाठी तांत्रिक मार्गदर्शन श्री नितेंद्र पानपाटील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक
श्री उल्हास ठाकूर तंत्र अधिकारी,गुणवत्ता नियंत्रण ,विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नाशिक
श्री अरुण तायडे,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक,धुळे यांनी केले.
जादा दराने कृषी निविष्ठांची विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा मा.विभागीय कृषी सहसंचालक नाशिकचे विभागीय कृषी अधिकारी वाघ साहेब यांनी दिला
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : चारचाकीने रिक्षाला धडक दिल्यावरून रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना २० रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंगरूळ ये...
-
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई अमळनेर : दलित वस्ती सुधारणा रस्त्याच्या कामाच्या बिलाच्या मोबदल्यात १० टक्के कमिशन मागणाऱ्या पा...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर आगाराच्या शिरपूर-पुणे बसमध्ये एका वृद्ध दाम्पत्याला अरेरावी करत बसमधून उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आय...
-
धुळे,नंदुरबार जिल्ह्या मध्ये आलेल्या अंदाज समिती ही धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्ट मंडळ धुळ्यात द...
-
नंदुरबार - नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मजूर स्थलांतर शून्य स्तरावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून स्थलांतर होणाऱ्या भागातील ग्रामस्थांचा सहभाग अस...
-
सध्या साक्री तालुक्यात खासगी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा (Private Agriculture Markets) झपाट्याने सुळसुळाट होत असून, प्रत्येक गावाच्या कोपऱ...
-
शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा