Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ मे, २०२४
Home
/
Unlabelled
/
ज्यांना मी घडवले त्यांनीच धोका दिला, आमच्या त्या विरोधकांना लोक नक्की जागा दाखवतील : मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित.
ज्यांना मी घडवले त्यांनीच धोका दिला, आमच्या त्या विरोधकांना लोक नक्की जागा दाखवतील : मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित.
नंदुरबार - युतीधर्म निभवायला सोबत येण्याच्या गप्पा मारायच्या आणि धक्का देण्याचे कारस्थानही रचायचे,असे दुटप्पी मित्र मला राजकारणात आल्यापासून लाभले आहेत.ज्यांची नगरसेवक म्हणून निवडून येण्याची पात्रता नव्हती त्यांना आम्ही नगराध्यक्ष केले.ज्यांची ताकद झेड.पी.गटाच्या पलीकडे नव्हती त्यांना जिल्हास्तरावर नावाजून दिलं,ते लोक आमच्या विरोधात सभा घेतात. परंतु जनतेला हे सगळे माहीत असल्यामुळे आज जनता आमच्या पाठीशी असून त्यांच्या विरोधाला कोणताही जनाधार उरलेला नाही; या शब्दात महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
नंदुरबार तालुक्यातील पथराईसह दहा-बारा गावांमधील ग्रामस्थांशी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी काल दिनांक 3 मे 2024 रोजी प्रत्यक्ष संपर्क केला.तसेच काही गावांमध्ये प्रचारार्थ भेटी दिल्या.स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेणे,बैठका घेणे,स्थानिक समस्यांवर चर्चा करणे यावर त्यांनी भर दिला.या दरम्यान झालेल्या कॉर्नर सभांमधून त्यांनी काँग्रेस कडून होत असलेल्या खोट्या प्रचाराचा समाचार घेतला.आमचे विरोधक कधीही स्वतः ठोस विकास काम करू शकले नाही त्यामुळे येता जाता खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत. सर्वाधिक काळ सत्तेत राहून सुद्धा काँग्रेस पक्षाने कधीही आदिवासींना खरा न्याय मिळवून दिला नाही त्यांना साधे वनपट्टे सुद्धा वेळेवर दिले नाही.मोदी सरकारच्या काळात मात्र वनगावे वनपट्टे सगळ्यांचेच प्रश्न सुटले.नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील लाखो घरांना आम्ही घरे दिली,लहान गावात सुद्धा काँक्रिटीकरण केले, महिलांना रोजगार आणि पाण्याची सुविधा दिली.मतदारांनी वारंवार संधी देऊन सुद्धा ज्यांना कधी विकास करता आला नाही, ते काँग्रेस नेते खोटं बोलून लोकांची दिशाभूल करीत आहे आणि आता आरक्षण,संविधान आणि त्यासारखे मुद्दे घेऊन पुन्हा मतं मागायला येत आहेत.खोटारडेपणा करून दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्यांना जागा दाखवा;अशा घणाघाती शब्दात मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : चारचाकीने रिक्षाला धडक दिल्यावरून रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना २० रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंगरूळ ये...
-
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई अमळनेर : दलित वस्ती सुधारणा रस्त्याच्या कामाच्या बिलाच्या मोबदल्यात १० टक्के कमिशन मागणाऱ्या पा...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आय...
-
शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
धुळे,नंदुरबार जिल्ह्या मध्ये आलेल्या अंदाज समिती ही धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्ट मंडळ धुळ्यात द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा