Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ मे, २०२४
Home
/
Unlabelled
/
प्रतिकूल परिस्थितीत मात करत टँकरने पाणी देत वाय.जी.मोरे साक्री यांनी घेतले कलिंगड चे विक्रमी उत्पादन
प्रतिकूल परिस्थितीत मात करत टँकरने पाणी देत वाय.जी.मोरे साक्री यांनी घेतले कलिंगड चे विक्रमी उत्पादन
साक्री तालुक्यातील काटवान भागातील अत्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बेहेड विठाई या परिसरातील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार वाय.जी.मोरे कृषी एजन्सी साक्रीचे संचालक यांच्या बेहेड शिवारातील स्व मालकीचे गट नं.311 येथे 25 फेब्रुवारी 2024 रोजी 3.5 एकर क्षेत्रावर कलिंगडच्या तीन वानांची लागवड केली होती त्यात बाहुबली,जिग्ना गोल्ड व अजित सीड्सचे हायब्रिक्स या वाणांचा समावेश होता मात्र लागवड केल्यानंतर केवळ एका महिन्यात त्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला विहिरींनी तळ गाठले होते बोर ही कोरडा झाला होता मात्र कुठल्याही डिप्रेशनमध्ये न येता व खचून न जाता त्यांनी अतिशय संघर्षमय अशा परिस्थितीत पिकाला टँकरने पाणी देण्याचा निर्णय घेतला मात्र एक ते दीड महिना टॅंकरने पाणी देणे ही बाब अतिशय चिंताजनक होती व मनाला न पटणारी होती मात्र तरीही त्यांनी सुमारे 380 टँकर्स पाणी पिकाला दिले ही बाब कुठल्याही शेतकऱ्यांसाठी न पटणारी आहे परंतु साडेतीन एकर च्या कलिंगडच्या प्लॉटला पाण्याची खूप जास्त गरज असते एवढे पाणी लागणे साहजिक आहे परंतु कलिंगड चा प्लॉट पाण्याअभावी सोडण्याची वेळ आली असतांना त्यांनी उत्कृष्ट नियोजन करून व कृत्रिम पाणी व्यवस्थापन करून साडेतीन एकरामध्ये कलिंगड चे 80 टन उत्पादन मिळवले मात्र हे सर्व करत असताना त्यांनी बाजारभावाची कुठलीही चिंता बाळगली नाही व सात ते आठ किलो चे एक फळ सरासरी पिकवण्यात त्यांना यश आले या 80 टन उत्पादन केलेल्या मालाला त्यांना बाजार भाव हा सरासरी केवळ 10.5 रुपये इतका मिळाला त्यात टँकरने पाणी टाकण्याचा खर्च दोन लाख रुपये होता व औषधे आणि खते ही बियाणे सह तीन लाख रुपये खर्च करण्यात आलेला होता त्यातून त्यांना एकूण उत्पन्न हे आठ लाख 40 हजार रुपयांचे मिळाले म्हणजेच त्यांना खर्च काढून एकरी फक्त एक लाख रुपये फायदा मिळाला परंतु त्यांना पाण्याअभावी त्यांच्या उत्पादन खर्चात दोन लाख रुपयाचे पाण्याचाा खर्च लागल्यामुळे त्यांच्या निव्वळ नफ्यात दोन लाखाची घट झाली हेच पाणी त्यांच्या विहिरीत राहिले असते तर त्यांना दोन लाख रुपये अधिक नफा मिळाला असता त्यामुळे भविष्यात साक्री तालुक्यातील काठवान भागात शासनाने सिंचनाचे प्रश्न सोडवले पाहिजेत तरच शेतकऱ्याला भविष्यात अच्छे दिन येथील अन्यथा शेतकऱ्यांना अशा दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेती करणे अतिशय जिकरीचे व संघर्षमय आणि खर्चिक होणार आहे एवढे मात्र नक्की.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा