Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १२ जुलै, २०२४

बोगस खत कारखाना उध्वस्त कृषी विभागाचे भरारी पथक व शिरपूर पोलीस यांची संयुक्त कारवाई.



आज दि.११.०७.२०२४ रोजी शिरपूर तालुक्यातील करवंद शिवारातील
आनंदवाडी येथे अनधिकृत खत कारखान्यावर धाड टाकून पाण्यात विद्राव्य खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करवंद शिवारातील आनंदवाडी येथे एका गोदामात मे.निर्मल फर्टीलायझर्स या नावाने बोगस पाण्यात विद्राव्य खते अनधिकृतपणे पिशव्यांमध्ये भरून ते शेतकरी बांधवांना विक्री हेतू साठवणूक केल्याचे समजले.
त्यानुसार शिरपूर पोलीस व कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून सुमारे २३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मे. निर्मल फर्टिलायझर्स या खत उत्पादकाचा परवाना मागील वर्षी रद्द केलेला असून देखील मे.निर्मल फर्टिलायझरचे मालक किशोर शालिकराव पाटील रा. करवंद ता.शिरपुर व त्यांचे साथीदार मनोज खेताराम पटेल रा. नारायण नगर,शिरपूर यांनी अनाधिकृतपणे बोगस खत १२:६१:००,००:५२:३४,
१९:१९:१९,१३:००:४५, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट या पाण्यात विद्राव्य खताच्या नावाने पिशव्यांमध्ये भरून ते शेतकऱ्यांना विक्री करणे हेतू पॅकिंग करत होते.
पोलीस निरीक्षक के.के पाटील, पीएसआय खैरनार, पीएसआय दरवडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, धुळे श्री.अरुण तायडे यांनी ही कारवाई केली आहे.
ही कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक मा.विकास पाटील, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी मा.प्रवीण देशमुख,नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक मा.रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा.कैलास शिरसाठ,तंत्र अधिकारी गुण नियंत्रण कृषी आयुक्तालय, पुणे श्री.रामा धायगुडे, व
श्री.शाहूराव मोरे,तंत्र अधिकारी श्री.उल्हास ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.
मोहीम अधिकारी
श्री. प्रदीप निकम,कृषी अधिकारी पंचायत समिती श्री.राजेश चौधरी,व
श्री.योगेश गिरासे,
तालुका कृषी अधिकारी शिरपूर श्री.संजय पवार, कृषी सहाय्यक श्री.राजेश चौधरी,श्री.दिपक गिरासे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक
श्री.नितेंद्र पानपाटील यांनी या कारवाईत भाग घेतला.
श्री.अरुण तायडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धुळे यांनी खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम,संरक्षण कायदा १९८६ व भारतीय न्याय संहीता २०२३ मधील कलम ३१८(४),३(५) अन्वये शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध