Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ जुलै, २०२४

श्री.व्ही.एस.नाईक कला वाणिज्य, आणि विज्ञान महाविद्यालय, रावेर येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा



रावेर तालुका प्रतिनिधी :-
श्री.व्ही.एस.नाईक कला वाणिज्य महाविद्यालय, रावेर येथे 11 जुलै2024 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही. दलाल यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूगोल विभाग प्रमुख प्रा.सी.पी.गाढे होते. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचे महत्त्व, त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम, आणि या समस्येवर उपाय यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एल.एम. वळवी यांनी केले. यावेळी उपस्थित तृतीय वर्ष बी.ए.द्वितीय वर्ष बी.ए., आणि प्रथम वर्ष बी.ए.च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रणाच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवली.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डी. वाय. महाजन यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत सजगता निर्माण झाली.यावेळी विभागातील बहुसंख्य विद्यार्थी हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध