Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १५ जुलै, २०२४

साक्रीत आंबेडकर चौक परिसरावर मुस्लिम जमावाची दगडफेक; दोषींवर कडक कारवाई व्हावी भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांची मागणी



 साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आंबेडकर चौक परिसर व चांदतारा मोहल्ला भागातील दोन गटात दिनांक दि.11 जुलै रोजी मागील भांडणाच्या कारणावरून दंगल उसळली.यावेळी आंबेडकर चौक वस्तीवर मुस्लिम जमावाकडून दगडफेक करण्यात आली. यानंतर मोठा जमाव एकत्र झाला व दगडफेकीचे रुपांतर दंगलीत झाले. या दंगलीत पाच जण जखमी झाले आहेत.धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दि. १४ जुलै रोजी येथील विश्रामगृहावर भाजपा पदाधिकार्‍यांची व समाजबांधवांची बैठक घेतली व सर्व घटनेची माहिती जाणुन घेतली. या बैठकीनंतर धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी प्रमुख पदाधिकार्‍यांसोबत साक्री पोलीस ठाण्याचे पीआय हर्षवर्धन गवळी यांची भेट घेवुन चर्चा केली.आंबेडकर चौक परिसरावर मुस्लिम जमावाने दगडफेक केली आहे.दोषींवर कडक कारवाई व्हावी व कायदा सुव्यवथा अबाधी राहावी यासाठी पोलिस चौकीची व्हावी अशी मागणी धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केली.बबनराव चौधरी यांनी जिल्हा पोलिस प्रमुख श्रीकांत ढिवरे यांचाशी सुध्दा फोनवर चर्चा केली,दि.१४ एप्रिल रोजी दोंडाईचा येथे मशीद समोरुन जाताना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीवर सुद्धा दगडफेक झाली होती. त्यामध्ये अनेक महिला,पुरुष जखमी झाले होते. त्यामुळे दलित समाजावर दगडफेक होण्याची धुळे जिल्ह्यातील ही दुसरी गंभीर घटना आहे असे सांगितले.साक्रीत दगडफेक घटना झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हागांराना अजुन अटक केली नाही ज्यांच्या वस्तीवर दगडफेक झाली त्या निर्दोषावरच गुन्हे दाखल करण्यात आले आहे असा आरोप प्रमुख पदाधिकार्‍यांनी केला.साक्री पोलीस ठाण्याचे पीआय हर्षवर्धन गवळी यांनी आरोपींना अटक करुन कडक कारवाई करण्यात येईल असे अश्वासन दिले.अनेक लोकांची नावे खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे.निर्दोष लोकांवर गुन्हे मागे घेऊन संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना जेरबंद करावे,अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पदाधिकार्‍यांनी दिला. यावेळी साक्री विधानसभा प्रभारी मोहन सुर्यवंशी,जिप कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी,शैलेंद्र आजगे,जिल्हा उपाध्यक्ष अॅड.गजेंद्र भोसले, विजय भोसले,साक्री तालुकाध्यक्ष संजय अहिरराव,युवराज महाले,विशाल पिंपळे,भाजपा अनु.जाती मोर्चा प्रदेश चिटणीस महेंद्र खैरनार, जिल्हाध्यक्ष विक्रम तायडे,माजी जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार,आरपीआय युवक प्रदेश सचिव नरेश गवळे,भाजपाचे योगेश भामरे,भाजपा तालुका सरचिटणीस अॅड.सुरेश शेवाळे,धनराज चौधरी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध