Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २५ जुलै, २०२४

बोगस बियाणे व अवाजवी खतांच्या किमतीच्या तक्रारीसाठी व्हाटस अप क्रमांक जाहीर .

 


अमळनेर i उपसंपादकशामकांत पाटील    

 

राज्यात बोगस बियाणे व खतांच्या चढत्या भावाने विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात शेतकऱ्यांना व्हाटस अप क्रमांक द्वारे तक्रार करता  येणार आहे. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव कृषी विभागाद्वारे गुपित ठेवण्यात येणार असून कृषी दुकान दाराविरूद्ध शासन नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

 

शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी ९८२२४४६६५५ या व्हाटस अप क्रमांकाचा  उपयोग करायचा  आहे. आता दुकानदार रासायनिक खते घेतांना कोणतीही अनावश्यक सक्ती शेतकऱ्यांना करू शकणार नसून, राज्य सरकारच्या या निणर्याचे शेतकऱ्याकडून   स्वागत केले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध