Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ जुलै, २०२४
Home
/
Unlabelled
/
दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी व्ही. रमणी पॅटर्न राबविणे तसेच राज्यातील दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविषयी आयोजित संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम, माजी आमदार सुरेश धस यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. चहल, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अन्न व औषश प्रशासन विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, तसेच केंद्रीय एफएसएसएआयचे अधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, अन्न पदार्थातील भेसळ ही गंभीर बाब आहे. यामुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यवर गंभीर दुष्परिणाम होतो. आपल्या भावी पिढीचेही नुकसान होणार आहे. कर्करोगांसारखा दुर्धर आजारही अनेकांना जडतो. त्यामुळे भेसळखोरांवर एमपीडीएपेक्षांही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्न पदार्थातील भेसळ व दुध तसेच दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात केंद्र व राज्य शासनाच्या दोन्ही यंत्रणांनी प्रभावीपणे कारवाईसाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी दोन्ही विभागांना सहकार्य केले जाईल. अद्ययावत प्रयोगशाळा, उपकरणे, मोबाईल प्रयोगशाळा यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल. दुधातील भेसळीचा दुध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी दुष्परिणाम देखील होतात. हे अत्यंत चिंताजनक असून, याला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. तातडीची उपाय योनजा म्हणून या दोन्ही विभागांनी संयुक्त मोहीमा आखाव्यात. त्यासाठी गृह विभागही सहकार्य करेल. दुधातील भेसळीविरोधात राज्याचा स्वतंत्र कायदा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाने कार्यवाही करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
बैठकीत माजी आमदार श्री. धस यांनी काही समाजकंटकांमुळे दुध भेसळ उघडकीस आली की त्याचा दुध विक्रीवर परिणाम होतो, त्याचा फटका अंतिमतः दुध उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याचे सांगितले.
शालेय शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न...
राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठीचा व्ही. रमणी पॅटर्न राबविण्याबाबतही चर्चा झाली. शालेय शिक्षणातील गुणवत्तावाढीसाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग एआयच्या वापरांसह विविधस्तरीय उपाययोजना करत आहे. त्यांच्याशी छत्रपती संभाजीनगरचे तत्कालिन आयुक्त व्ही. रमणी यांनी राबविलेल्या पॅटर्नची सांगड घालण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. हा पॅटर्न जिल्हा परिषदांबरोबरच, राज्यातील महानगरपालिकांच्या शाळांत राबवण्यात येईल, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा